School Fees Issue: दिवसेंदिवस शिक्षणाचा (Education)  खर्च मोठ्या प्रमाणात वाढत आहे. लहान मुलांच्या शिक्षणाचा खर्च देखील लाखो रुपयांच्या घरात होत आहे. हा खर्च सर्वसामान्यांच्या खिशाला परवडत नाही. नर्सरी स्कूलसाठी जर लाखो रुपयांचा खर्च (Nursery fee) येत असेल तर पुढच्या शिक्षणासाठी किती खर्च येईल? असा सवाल उपस्थित केला जातोय. दरम्यान, दिल्लीतील (Delhi) एका  चार्टर्ड अकाउटंट (CA) असणाऱ्या पालकाने आपल्या मुलीच्या शाळेच्या फी संदर्भात सोशल मीडियावर ट्वीटरवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी आपल्या मुलीच्या नर्सरी स्कूलची फी 4 लाख 30 हजार रुपये असल्याचं सांगितलं आहे. 


दिल्लीतील एका पालकाने आपल्या लहानग्या मुलीच्या शाळेची किती फी आहे, याबाबतची यादीच सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. दिल्लीतील आकाश कुमार  असं या चार्टर्ड अकाउटंटचे नाव आहे. माझ्या संपूर्ण शिक्षणाला जेवढा खर्च झाला नाही, तेवढी माझ्या मुलीच्या शिक्षणाची एका वर्षाची फी असल्याचं आकाश कुमार यांनी म्हटलंय.  


 






आकाश कुमार यांनी व्टीटरवर नेमकं काय म्हटलंय?


आकाश कुमार हे दिल्लीत चार्टर्ड अकाउंटंट आहेत. त्यांनी स्वत:च्या मुलीला नर्सरी स्कूलसाठी किती फी आहे याची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. माझे पूर्ण शिक्षण करण्यासाठी देखील मला एवढा खर्च आला नसल्याची भावना त्यांनी पोस्टमध्ये बोलून दाखवली आहे. तसेच मला आशा आहे की, मुलीला त्या ठिकाणी चांगले शिक्षण मिळेल असा उल्लेखही त्यांनी पोस्टमध्ये केला आहे. 


पोस्टला आत्तापर्यंत 20 लाखाहून अधिक व्ह्यूज


दरम्यान, आकाश कुमार यांनी सोशल मीडियावर टाकलेली पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. यावर पोस्टर विविध प्रतिक्रिया देखील येत आहेत. या पोस्टला आत्तापर्यंत 20 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर हजारो कॉमेंट्स आल्या आहेत. तर काही लोकांनी या पोस्टवर मजेशील कॉमेंट्स केल्या आहेत. दरम्यान, काही लोकांना 4.30 हजार रुपयांची फी एकूण धक्का बसला आहे. कारण एवढ्या लहान मुलांना देखील शाळेत एवढी फी आकारली जात आहे.   


दिवसेंदिवस शिक्षण महाग होत चाललं आहे. खासगी शाला मोठ्या प्रमाणात शिक्षणाचा खर्च घेत आहेत. ज्या पालकांची परिस्थिती चांगली आहे, ते पालक मोठ्या शाळेत मुलं पाठवू शकतात. पण ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे, अशा मुलांना मोठ्या शाळेत शिक्षण घेणं शक्य होत नाही. 


महत्वाच्या बातम्या:


Maharashtra School : मोठी बातमी! राज्यातील चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी 9 नंतर भरणार; राज्य सरकारचे आदेश जारी