Gautam Adani : सध्या भारतात विश्वचषक सुरु आहे. या विश्वचषकादरम्यान गौतम अदानी यांनी विमान कंपन्यांना मोठा धक्का दिला आहे. गौतम अदानी यांनी अहमदाबाद विमानतळावरील भाड्यात 10 पटीनं वाढ केली आहे. याबाबतचा आरोप विमान कंपन्यांनी अदानी ग्रुपवर केलाय.  शुक्रवारी संध्याकाळी विमानतळाचे दर ठरवणाऱ्या सरकारी विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरणाकडून नोटीसही जारी करण्यात आली आहे. 


वर्ल्डकपच्या साखळी सामन्यांव्यतिरिक्त अंतिम सामनाही अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. नुकताच याच याठिकाणी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामनाही झाला होता. अंतिम सामनाही याच मैदानावर होणार आहे. अशा परिस्थितीत अदानी या संधीचे भांडवल करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. वास्तविक अहमदाबाद विमानतळ गौतम अदानी यांच्याकडे आहे. या प्रकरणी अनेक विमान कंपन्यांनी केंद्र सरकारकडे तक्रार केली असून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणीही केली आहे.


विमान कंपन्यांचे अदानी समूहावर आरोप 


अहमदाबाद विमानतळाने ग्राउंड हँडलिंग चार्जेसमध्ये 10 पटीनं वाढ केल्याचा आरोप विमान कंपन्यांच्या वतीने अदानी समूहावर करण्यात आला आहे. त्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी विमानतळाचे दर ठरवणाऱ्या सरकारी एजन्सी विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरणाकडून नोटीसही जारी करण्यात आली. प्राधिकरणाच्या मते, त्यांच्या परवानगीशिवाय कोणतेही शुल्क आकारणे बेकायदेशीर आहे. विमानतळ चालक परवानगीशिवाय शुल्क आकारत आहेत, जे योग्य नाही, असेही सरकारी यंत्रणेकडून सांगण्यात आले. मात्र, याबाबत अदानी प्रवक्त्यांकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही. काही विमानतळ चालक मंजुरी न घेता शुल्क आकारत आहेत, जे योग्य नसल्याचे प्राधिकरणाने म्हटले आहे. सर्व विमानतळ चालकांनी असे शुल्क आकारणे टाळावे. अदानी विमानतळाच्या प्रवक्त्याने प्रश्नांना उत्तर दिले नाही.


विमानतळ व्यवस्थापनाला बोलावले


विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरणाने विमानतळाच्या उच्च व्यवस्थापनाला समन्स बजावले असून, सोमवारी हजर राहण्यास सांगितले आहे. अहमदाबाद विमानतळाच्या सप्टेंबरमध्ये जारी केलेल्या दरसूचीनुसार, 15 पेक्षा जास्त प्रवासी असलेल्या चार्टर फ्लाइट्सवर सामान्य विमानचालन शुल्क किमान 265,000 रुपये आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक प्रवाशाकडून 17,667 रुपये आकारले जातील. तसेच, विमानतळाने आयपीएल सामन्यांदरम्यान चालवल्या जाणार्‍या विशेष फ्लाइटसाठी प्रति प्रवासी 6,000 रुपये अधिक आकारले आहेत. हे शुल्क लँडिंग आणि पार्किंग शुल्काव्यतिरिक्त आहेत. याशिवाय विमान कंपन्यांना असेही सांगण्यात आले आहे की, विशिष्ट हंगामातील कोणत्याही फ्लाइटची माहिती न दिल्यास ती चार्टर मानली जाईल.


विमान कंपन्यांचे नुकसान होणार 


इंडिगो, स्पाइसजेट आणि विस्तारा यांनी जुन्या दरांच्या आधारे क्रिकेट संघांची वाहतूक करण्यासाठी बीसीसीआयला बोली लावली होती. कंपन्यांच्या म्हणण्यानुसार अहमदाबाद विमानतळाचे शुल्क अशाप्रकारे वाढवल्याने कंपन्यांचे मोठे नुकसान होणार आहे. याचे कारण बीसीसीआयने अतिरिक्त शुल्क भरण्यास नकार दिला आहे. जगभरातील क्रिकेटप्रेमींना आणण्यासाठी विमान कंपन्या विशेष चार्टर उड्डाणेही चालवत आहेत. अहमदाबाद विमानतळावरून ऑक्टोबरमध्ये 170 हून अधिक चार्टर उड्डाणे उडाली, जी सामान्यपेक्षा 4 पट जास्त आहे.


एजन्सीची परवानगी घेणे आवश्यक 


मीडिया रिपोर्टमध्ये माहिती देताना अदानी विमानतळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हे अतिरिक्त शुल्क वैमानिक शुल्कांतर्गत येत नाही. त्यामुळे यासाठी कोणाचीही परवानगी घेण्याची गरज नाही. कंपनी वाढलेल्या दरांचा आढावा घेत असल्याचेही त्यांनी नमूद केले. सरकारी बाजूच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले की विमानाच्या ऑपरेशनमध्ये अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ग्राउंड हँडलिंग सेवांसाठी शुल्क लागू करण्यात आले आहे. नियम स्पष्ट आहेत आणि विमानतळावर विमान चालवण्यासाठी ज्या काही सेवा पुरवल्या जातात त्या वैमानिक सेवांच्या अंतर्गत येतात. जी सरकारी एजन्सीच्या अंतर्गत येते.


महत्वाच्या बातम्या:


Adani Group : अदानी समुहात नवीन 13 हजार नोकऱ्या निर्माण होणार, 'या' क्षेत्रावर अदानी ग्रुपचा भर