Garlic Price : लसणाच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. भुवनेश्वरच्या (Bhubaneswar) बाजारात लसणाचे दर (Garlic Price) हे 400 रुपये किलोवर पोहोचला आहे. अनेक भागात लसणाच्या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं दरात वाढ होत आहे. दरम्यान, या महिन्यात किंमती कमी होण्याची शक्यता आहे. 


सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसत आहे. दिवसें दिवस महागाई खूप वाढत आहे. लसणाच्या दरात वाढ होताना दिसत आहे. लसणाचा दर किलोमागे 400 रुपयांवर पोहोचले आहेत. लसणाच्या दरात एवढी वाढञ का होत आहे. दर कमी होणार का? याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात.


लसणाचे भाव वाढण्याचं कारण काय?


गेल्या काही आठवड्यात लसणाच्या दरात झपाट्यानं वाढ होत आहे. भुवनेश्वरच्या बाजारात लसणाचे भाव 400 रुपये किलोवर पोहोचला होता.  खराब हवामानामुळे अनेक राज्यांमध्ये लसूण पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. लसणाच्या भावात वाढ होण्यामागे हेच प्रमुख कारण आहे.  आहे. पिकाच नुकसान झाल्यामुळं दुसऱ्या पिकाची लागवड करण्यास वेळ लागला. त्यामुळे नवीन लसूण पिकाची आवक होण्यास विलंब होत आहे. त्यामुळं भाव वाढत आहेत.


लसणाचे दर कमी होतील का?


मध्य प्रदेशात लसणाची सर्वाधिक लागवड केली जाते. मात्र, खराब हवामानामुळं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळं नवीन पीक येण्यास विलंब होत आहे. दरम्यान, लसणाचे पीक बाजारात येताच, लसणाचे भाव उतरतील असा अंदाज आहे. बाजारातील व्यापाऱ्यांच्या मते खरीप लसणाची आवक झाल्यानंतर भावात लक्षणीय घट होईल. म्हणजे फेब्रुवारी महिन्यात लसणाचे भाव कमी होण्याची शक्यता आहे.


भारतात 32 लाख टन लसूण पिकतो


भारतात सुमारे 32.7 लाख टन लसणाचे उत्पादन होते. भारतात लसणाचे सर्वाधिक उत्पादन मध्य प्रदेशात होते. मात्र, चीनमध्ये उत्पादनात घट होऊनही ते जगात पहिल्या क्रमांकावर आहे. चीनमध्ये दरवर्षी सुमारे 2 ते 25 दशलक्ष टन लसणाचे उत्पादन केले जाते, जरी दोन्ही देशांमध्ये बहुतेक लसणाचा वापर देशांतर्गत केला जातो.


जागतिक बाजारात भारताच्या लसणाचे दर काय?


भारतातील लसूण आकाराने चीनच्या लसूणपेक्षा किंचित लहान आहे. त्याच वेळी, त्याचा दर चीनपेक्षा खूपच कमी आहे. जागतिक बाजारपेठेत चिनी लसणाची किंमत 1250 डॉलर प्रति टन आहे, तर भारतीय लसणाची किंमत 450 ते 1000 डॉलर प्रति टन आहे. त्यामुळे भारत गरीब ते श्रीमंत देशांच्या गरजेनुसार लसणाचा दर्जा देण्यास सक्षम आहे. चिनी लसणाची मागणी बहुतांशी अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये आहे, तर भारत मलेशिया, थायलंड, नेपाळ आणि व्हिएतनाममध्ये मोठ्या प्रमाणावर लसूण निर्यात करतो


महत्वाच्या बातम्या:


India vs China : भारत-चीनच्या नव्या युद्धाला 'लसूण' ठरणार कारणीभूत? चीनच्या अडचणीत वाढ; नेमकं प्रकरण काय?