Mukesh Ambani world 7th richest person | भारतील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी आता संपूर्ण जगातील सातवे श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जाणार आहेत. त्यांनी बर्कशायर हॅथवेच्या वॉरेन बफेट, गूगलचे लॅरी पेज आणि Serge Brin यांना मागे टाकले आहे. जगभरातील टॉप-10 श्रीमतांच्या यादीत संपूर्ण आशिया खंडातील एकमेव नावाचा समावेश झाला आहे. ते नाव म्हणजे, मुकेश अंबानी यांचं. फोर्ब्स मॅगझिनने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची एकूण संपत्ती 70 अब्ज डॉलर एवढी आहे.


20 जून रोजी मुकेश अंबानी फोर्ब्सच्या लिस्टमध्ये नवव्या स्थानी होते. त्यावेळी त्यांची एकूण संपत्ती 64.5 अब्ज डॉलर एवढी होती. फक्त 20 दिवसांत त्यांची संपत्ती 5.4 अब्ज डॉलर्सनी वाढली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीचा मार्केट कँप 12 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे.


कंपनीच्या शेअर किंमतीवर आधारित मालमत्तेचे मूल्यांकन


फोर्ब्स रियल टाइम बिलेनियर रॅकिंग्स ( Forbes' Real-Time Billionaires rankings) मध्ये संपत्तीचं मूल्यांकन शेअर्सच्या किमतींच्या आधारावर ठरवण्यात येतं. हे दर पाच मिनिटांनी अपडेट होतं. रिलायन् इंडस्ट्रीजमध्ये अंबानी यांचे शेअर 42 टक्के आहेत. आज शेअर्समध्ये जवळपास 3 टक्क्यांनी वाढले आहेत. याचे शेअर्सनी 52 आठवड्यांतील उच्चांक गाठला आहे. आज हे शेअर्स 1878.50 रुपयांवर बंद झाला. तर 52 सप्ताहांचा उच्चांकांचा 1884.40 रूपये आहे.


जेफ बेजोस पहिल्या क्रमांकावर


आजच्या लिस्टमध्ये जेफ बेजोस पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 188.2 अब्ज डॉलर, बिल गेट्स दुसऱ्या क्रमांकावर (110.70 अब्ज डॉलर), बर्नार्ड ऑर्नोल्ट फॅमिली तिसऱ्या क्रमांकावर (108.8 अब्ज डॉलर), मार्क जुकरबर्ग चौथ्या क्रमांकावर (90 अब्ज डॉलर), स्टीव बॉल्मप पाचव्या क्रमांकावर (74.5 अब्ज डॉलर), लॅरी एलिसन सहाव्या क्रमांकावर (74.4 अब्ज डॉलर), मुकेश अंबानी सातव्या क्रमांकावर (70.10 अब्ज डॉलर) आहे. यानंतर वॉरेन बफेट, त्यानंतर लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन आहेत.


महत्त्वाच्या बातम्या : 


Jio-Facebook करारानंतर मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती


अमेरिकी कंपनी ‘सिल्वर लेक’ची जिओमध्ये 5,656 कोटींची गुंतवणूक