Food Theft : एकेकाळी संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या देशातील जनता आता उपासमारीच्या संकटाचा सामना करत आहे. ब्रिटनमध्ये (Britain) प्रचंड महागाईमुळं जगण्याच्या खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. उपासमारीनं जनतेचं कंबरडं मोडलं आहे. लोक खाद्यपदार्थ चोरून काळ्या बाजारात स्वस्त दरात उपलब्ध करून देत आहेत. अशी ब्रिटनमधील लोकांची दुर्दशा आहे. 


ब्रिटनमध्ये मोठ्या दुकानांमध्ये चोरी होण्याच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. लोक मोठ्या दुकानातून खाद्यपदार्थ चोरून काळ्या बाजारात विकत आहेत. यासाठी देशातील महागाईला जबाबदार धरले जात आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, ब्रिटनमध्ये विक्रमी शॉपलिफ्टिंग प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. या आकडेवारीच्या आधारे मोठमोठ्या दुकानांमध्ये चोरीच्या घटना झपाट्याने वाढत असल्याचे गार्डियनने वृत्त दिले आहे. ब्रिटिश रिटेल कन्सोर्टियमच्या अंदाजानुसार, 2023 मध्ये चोरी झालेल्या वस्तूंचे मूल्य अंदाजे 1 अब्ज पौंड (1.3 अब्ज डॉलर) आहे.


लोक मांस, चीज आणि मिठाई यांसारख्या वस्तू चोरतायेत


एका अहवालानुसार, सर्वाधिक चोरी झालेल्या वस्तूंमध्ये मांस, चीज आणि मिठाई या वस्तूंचा समावेश आहे. अशा वस्तू सहज विकल्या जातात. महागाईने त्रस्त झालेले लोक लगेच खरेदी करतात. या खाद्यपदार्थांची दुकाने आणि ट्रकमधून चोरी होत आहे.


वाढत्या खर्चाचा लोकांना मोठा फटका 


ब्रिटनमध्ये राहणीमानाच्या वाढत्या खर्चामुळं लोक नवीन मार्गांच्या शोधात आहेत. ब्रिटीश इंडिपेंडंट रिटेलर्स असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अँड्र्यू गुडेकर म्हणाले की लोक आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी कमी किमतीचे मार्ग शोधत आहेत. ज्या दुकानांमध्ये कधीही चोरी झाली नाही, तिथेही लोक काही सेकंदात संपूर्ण दुकान साफ ​​करतात. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांची काळ्या बाजारात वाढती मागणी.


किराणा कंपन्यांनी वस्तूंच्या दरात केली वाढ 


अहवालानुसार, देशात अन्नधान्याच्या किंमती झपाट्याने वाढल्या आहेत. देशात अन्नधान्याची गरिबी शिगेला पोहोचली आहे. फूड बँक लोकांना जगण्यासाठी आवश्यक तेवढे अन्नही देत ​​आहेत. त्यांना फूड बँकेतून पोषक आहार मिळत नाही. लोकांकडे पैसे नाहीत. घरच्यांना परावृत्त करून ते थकले आहेत, त्यामुळे चोरीचे प्रमाण वाढत आहे. नुकत्याच झालेल्या कॉम्पिटिशन अँड मार्केट अथॉरिटी (सीएमए) च्या अहवालानुसार देशातील मोठ्या किराणा कंपन्या अनावश्यकपणे किंमतीत झपाट्याने वाढ करत आहेत. सीएमएच्या अहवालानुसार ऑक्टोबरमध्ये महागाईचा दर 10.1 टक्क्यांवर आला होता. पण आता तो पुन्हा ऐतिहासिक शिखरावर आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


व्हेज थाळी महागली, किंमतीत 5 टक्क्यांची वाढ; दर वाढण्याची कारणं काय?