मुंबई : ॲपल या टेक विश्वातील दिग्गज कंपनीने नुकतेच मोबाईलची आयफोन 16 (iphone 16) ही सिरीज लॉन्च केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ॲपलच्या या फोन सिरीजची संपूर्ण जग प्रतीक्षा करत होते. दरम्यान, आयफोन 16 ही सिरीज लॉन्च झाल्यानंतर आयफोन 15 या सिरीजमधील फोन स्वस्त झाले आहेत. असे असतानाच आता फ्लिपकार्टच्या 'बिग बिलियन डे'मध्ये (Flipkart Big Billion Days 2024) हे फोन आणखी स्वस्त होणार आहेत. बिग बिलियन डेजमध्ये हे फोन अगदी एका लाखात घेता येणार आहेत. 


बिग बिलियन डेजची नेमकी ऑफर काय? 


फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग स्टोअरवर येत्या 27 सप्टेंबरपासून बिग बिलियन डेज चालू होणार आहेत. या काळात वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक तसेच इतर अनेक वस्तूंवर मोठी सूट मिळणार आहे. या काळात वस्तूंवर कित्येक हजारांची सूट मिळणार आहे. 6 ऑक्टोबरपर्यंत फ्लिपकार्टची ही बिग बिलियन डेजची ऑफर चालू राहणार आहे. याच बिग बिलियन डेजमध्ये आयफोनवरही मोठी सूट मिळणार आहे. 


नेमका किती रुपयांना मिळणार आयफोन 15 


फ्लिपकार्टने आपल्या या बिग बिलियन डेजची माहिती देण्यासाठी नुकताच एक टिझर दिला आहे. यामध्ये फ्लिपकार्टने आयफोन 15 सिरीजमधील एवेगवेगळ्या फोनची किंमत जाहीर केली आहे. या टिझरनुसार आयफोन 15 प्रो (iPhone 15 Pro) या मोबाईलची मूळ किंमत 1 लाख 09 हजार 900 रुपये आहे. पण बिग बिलियन डेजमध्ये हा फोन अवघ्या 89 हजार 999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. तर आयफोन 15 प्रो मॅक्स (iPhone 15 Pro Max) या फोनची मूळ किंमत 1 लाख 34 हजार 900 रुपये आहे. हा फोन बिग बिलियन डेजमध्ये अवघ्या 1 लाख 09 हजार 999 रुपयांना मिळणार आहे. म्हणजेच आयफोन 15 प्रो या मॉडेलवर तब्बल 19,901 रुपयांची सूट मिळणार आहे. तर आयफोन  15 प्रो मॅक्स या मॉडेलवर 34 हजार 901 रुपयांची सूट मिळणार आहे. 


व्हीआयपी ग्रहकांना अतिरिक्त 2000 रुपयांची सूट


विशेष म्हणजे फ्लिपकार्टच्या व्हीआयपी ग्रहकांना 26 स्प्टेंबर रोजी अर्ली अॅक्सेस मिळणार आहे. त्यामुळे त्यांना या आयफोनच्या खरेदीवर अतिरिक्त 2000 रुपयांची सूट मिळणार आहे. 


हेही वाचा :


मोठी बातमी! लवकरच सुरु होणार फ्लिपकार्ट Big Billion Days 2024 सेल; 1 लाखांहून अधिक लोकांना मिळणार नोकऱ्या


OnePlus nord 3 5G  Price Drop : OnePlus Nord 3 5G  झालाय स्वस्त,  फ्लिपकार्ट, ॲमेझॉनवर सुरू आहेत भन्नाट ऑफर्स!


Iphone 13 : iPhone 13 झाला स्वस्त! फ्लिपकार्ट-अमेझॉनवर किती आहे किंमत? जाणून घ्या