OnePlus nord 3 5G  Price Drop : OnePlus ने अफोर्डेबल 5G स्मार्टफोनच्या किंमती  (OnePlus) घटवल्या आहेत. Nord सीरिजचा (OnePlus smartphone offers) सगळ्यात पावरफुल असलेला फोन OnePlus nord 3 5G वर ऑफर (offers) मिळत आहेत. तुम्हाला दमदार प्रोसेसर ,चांगला कॅमेरा आणि मोठी बॅटरी मिळणार आहे. चला तर जाणून घेऊया OnePlus Nord 3 5G च्या किंमत आणि ऑफर्स...


जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा प्लॅनिंग करत असाल तर OnePlus Nord 3 5G  यावर आकर्षक डिस्काउंट मिळत आहे. हा स्मार्टफोन तुम्ही काही हजार रुपयांच्या डिस्काउंटपर्यंत खरेदी करू शकता.  कंपनीने OnePlus Nord 3 5G या वर्षाच्या सुरुवातीला लॉंच केला होता. कंपनीच्या नॉर्ड लाइनअपमधील हा सर्वात पॉवरफुल फोन आहे. Nord 3 5G मध्ये तुम्हाला 120Hz रिफ्रेश रेटसह AMOLED डिस्प्ले मिळेल.  तसेच यात हँडसेट MediaTek Dimensity 9000 प्रोसेसर येतो. 


OnePlus nord 3 5G : किती रुपयांपर्यंत मिळेल हा फोन? 


सुरूवातीला OnePlus Nord 3 5G कंपनीने 33,999 रुपयांच्या किमतीत लॉंच केला होता. ही किंमत फोनच्या 8GB RAM+128GB स्टोरेज वेरिएंटसाठी आहे.   आता यावर 4000 रुपयांची सवलत दिली जात आहे, त्यानंतर फोनची किंमत 29,999 रुपयांपर्यंत खाली आली आहे.  यावर 2000 रुपयांची बँक सवलत देखील उपलब्ध आहे.


तसेच त्याचा 16GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिएंट 33,999 रुपयांना उपलब्ध आहे.  यावरही तुम्हाला बँक डिस्काउंटचा फायदा मिळेल.  तुम्ही हँडसेट दोन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करू शकता. त्यात एक म्हणजे ग्रे कलर आणि ग्रीन कलर उपलब्ध आहे.


काय आहे याची स्पेसीफिकेशन्स? 



OnePlus Nord 3 5G मध्ये 6.74-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येईल.स्क्रीनच्या संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस देण्यात आला आहे.  यात MediaTek Dimensity 9000 प्रोसेसर आहे.  तुम्ही हँडसेट 16GB पर्यंत रॅम पर्यायामध्ये खरेदी करू शकता.


त्यात Android 13 वर आधारित oxygen OS उपलब्ध आहे.  फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सोबत येतो, जज्याचीमेन लेन्स 50MP आहे. याशिवाय 8MP अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो कॅमेरा उपलब्ध आहे.  कंपनीने फ्रंटमध्ये 16MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. तसेच हा स्मार्टफोन 5000mAh बॅटरी आणि 80W चार्जिंगसह येतो.


इतर महत्वाची बातमी-


Xamalicious Malware : 'या' 14 अँड्रॉइड अ‍ॅप्समध्ये सापडला धोकादायक मालवेअर, तुमच्याकडे यापैकी एकही अ‍ॅप नाही ना?