Badlapur Akshay Shinde Encounter: राज्याला हादरवून टाकणाऱ्या बदलापूरमधील खासगी शाळेतील लैंगिक अत्याचार (Badlapur School Crime News) प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याचा सोमवारी सायंकाळी अचानक पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. या खळबळजनक घटनेमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.


सोमवारी सायंकाळी सव्वासहा वाजता अक्षय शिंदेचा (Akshay Shinde) तळोजा कारागृहातून ट्रान्झिट रिमांडच्या आधारे ताबा घेऊन पोलिस त्याला ठाण्याकडे आणत होते. अचानक त्याने वाहनात शेजारी बसलेल्या सहायक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे यांचे रिव्हॉल्वर हिसकावून गोळीबार केला. यात मोरे गंभीर जखमी झाले. अक्षय शिंदे पळून जाण्याची भीती असल्याने सीआययूचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे (Sanjay Shinde) यांनी त्यांच्या रिव्हॉल्वरमधून अक्षय शिंदेच्या दिशेने 3 गोळ्या झाडल्या. त्यात तो गंभीर जखमी झाला. कळवा महापालिका रुग्णालयात नेल्यानंतर तो मरण पावल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.


अक्षय शिंदेच्या दिशेने गोळ्या झाडणारे संजय शिंदे कोण?


पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी यापूर्वी माजी पोलिस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे. संजय शिंदे यांनी यापूर्वी ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी कक्षात काम केले आहे. तत्कालीन आयपीएस प्रदीप शर्मा त्याचे नेतृत्व करत होते. 


इक्बाल कासकर याला अटक करणाऱ्या टीममध्ये संजय शिंदे-


प्रदीप शर्मा यांची मुंबई पोलिसांमध्ये एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळख होती. आपल्या कारकिर्दीत त्यांनी 300 हून अधिक गुन्हेगारांचा सामना केल्याचे सांगितले जाते. विशेषतः 1990 च्या दशकात दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन टोळ्यांशी संबंधित गुंडांना त्यांनी लक्ष्य केले. गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला अटक करणाऱ्या टीममध्ये संजय शिंदे देखील होते. संजय शिंदे यांनी यापूर्वी मुंबई पोलिसातही काम केले आहे. सध्या ते बदलापूर बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाचा (एसआयटी) भाग आहे.


संजय शिंदेंवर आरोप काय?


संजय शिंदे यांच्यावर यापूर्वीही काही आरोप झाले आहेत. खुनाचा आरोपी विजय पालांडे पोलिसांच्या ताब्यातून फरार झाल्यानंतर संजय शिंदेंना निलंबित करण्यात आले. पालांडेला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप संजय शिंदेंवर होता. पालांडेच्या गाडीत शिंदे यांचा गणवेशही सापडला होता. त्यानंतर 2014 मध्ये मुंबई पोलिसांनी संजय शिंदे यांना पुन्हा कामावर घेतले.


दुसऱ्यांना वाचवण्यासाठी माझा मुलाचा जीव घेतला; अक्षय शिंदेच्या आईचा आरोप, व्हिडीओ: