Financial Freedom : काही काळानंतर माणूस काम करुन थकतो. मग तो विचार करतो की, आज नोकरी सोडली तर त्याचा खर्च कसा भागणार? अशी समस्या टाळण्यासाठी तुम्ही तुमचे आर्थिक उद्दिष्ट आधीच ठरवून ते पूर्ण करण्याची तयारी सुरू करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला नवीन वर्षात आर्थिक स्वातंत्र्य हवे असेल तर तुम्हाला दरमहा काही पैशांची एसआयपी करावी लागेल.


तरुण काळात अनेकजण आर्थिक स्वातंत्र्याचा विचार करत नाहीत. सोप्या भाषेत, आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे ते स्वातंत्र्य, जे प्राप्त केल्यानंतर माणसाला पैसे कमावण्याची गरज नसते. त्याचा खर्च आणि छंद यात भागवले जातात. आर्थिक स्वातंत्र्य साध्य करण्याचा एक अनोखा मार्ग जाणून घेऊयात.


वाढत्या महागाईमुळं पैसा होतो खर्च


जर तुम्ही अद्याप आर्थिक उद्दिष्ट साध्य केलं नसेल तर हे लक्षात ठेवलं पाहिजे की, येणाऱ्या महागाईमुळं तुमच्या गरजा वाढू शकतात. त्यामुळं आर्थिक उद्दिष्टे वेळेवर पूर्ण करणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला आयुष्यात काय हवे आहे, तुम्हाला काय खरेदी करायचे आहे आणि त्यासाठी किती पैसे हवे आहेत हे ठरवणं महत्त्वाचं आहे. फॉर्म्युला 30-20-50 देखील मदत करू शकते. या नियमानुसार, एखादी व्यक्ती त्याच्या कमाईतील 20 टक्के गुंतवणूक करते आणि उर्वरित भाग आवश्यक खर्च आणि छंद पूर्ण करण्यासाठी वापरते.


किती रुपयांचा SIP कराल?


समजा, तुमचे वय 25 ते 30 वर्षांच्या दरम्यान आहे आणि तुम्हाला पुढील 20 वर्षांत आर्थिक स्वातंत्र्य मिळेल, तर तुम्ही आजच SIP सुरू करावी. तुम्ही कोणत्याही प्रकारच्या फंडात पैसे गुंतवू शकता. त्यासाठी तुम्ही सल्लागाराशीही संपर्क साधू शकता. म्युच्युअल फंड साधारणपणे 12 ते 15 टक्के सरासरी परतावा देतात. कधीकधी ते 20 टक्के परतावा देखील देतात. जर तुम्हाला 15 टक्के परतावा मिळत असेल, तर तुम्हाला पुढील 20 वर्षांत 1.5 कोटी रुपयांचा निधी तयार करण्यासाठी दरमहा केवळ 10,000 रुपये गुंतवावे लागतील. जर तुम्ही कोणत्याही अंतराशिवाय हे केले आणि 15 टक्के परतावा मिळाला तर तुम्हाला 20 वर्षांनी 1 कोटी 52 लाख रुपये मिळतील. हा आकडा सरासरीच्या आधारावर दिला जातो. तुम्ही तुमच्या आर्थिक उद्दिष्टांवर आधारित गुंतवणुकीची रक्कम वाढवू किंवा कमी करू शकता.


गुंतवणुकीबाबत जागरुक राहण्याची गरज


या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला श्रीमंत व्हायचे आहे. प्रत्येकाचे ध्येय लक्षाधीश बनणे हेच आहे. मात्र, यासाठी गुंतवणुकीबाबत जागरुक राहण्याची गरज आहे. पण हे देखील काही प्रमाणात खरे आहे की आजच्या काळात करोडपती बनणे अवघड काम नाही. उतारवयात येणाऱ्या आर्थिक समस्या टाळण्यासाठी प्रत्येकाने योग्य वेळी नियोजन केले पाहिजे. अशा परिस्थितीत, 2024 हे नवीन वर्ष येणार आहे. जर तुम्हाला नवीन वर्षात गुंतवणुकीचे पाऊस टाकायचे असेल तर तुम्ही विचार करु शकता. एकदा गुंतवणुकीचे पहिले पाऊल टाकले की आपोआपच उद्दिष्टे सोपे होते. त्यामुळं गुंतवणुकीसाठी SIP सुरू करणं फायद्याचे आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


नवीन वर्षात गुंतवणुकीचा प्लॅन काय? दरमहा 5000 गुंतवा काही दिवसातच करोडपती व्हा; जाणून घ्या सविस्तर माहिती