US Inflation : जगातील महासत्ता असलेला देश अशी अमेरिकेची (America) ओळख आहे. पण, जगातील इतर देशांप्रमाणेच आता अमेरिकेलाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अमेरिकेतील महागाई उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार, यूएस फेडरल रिझर्व्हने मुख्य कर्ज दर  0.25 टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे तसेच हे दर आणखी न वाढविण्याचे संकेतही दिले आहेत. या निर्णयाने यूएस मध्यवर्ती बँकेचा बेंचमार्क रातोरात 5-5.25 टक्के व्याजदराच्या श्रेणीत पोहोचला आहे. मार्च 2022 पासून यूएस फेडची ही सलग दहावी वाढ नोंदविण्यात आली आहे.


यूएस फेडने महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी दर वाढवण्यास सुरुवात केली होती. गेल्या वर्षी महागाईचा दर 9.1 टक्के होता. आता हा दर 5.25 टक्के आहे. त्यामुळे अमेरिकेतील महागाईचा संपूर्ण जगावर परिणाम होणार आहे.


यूएस फेडरलच्या दोन दिवसांच्या या बैठकीनंतर असे सूचित करण्यात आले की, "अतिरिक्त धोरण निश्चित करणे किती प्रमाणात योग्य असू शकते हे ठरवण्यासाठी", अधिकारी येत्या महिन्याभरात अर्थव्यवस्था, चलनवाढ आणि वित्तीय बाजार कसा व्यवहार करतात हे पाहून ठरवले जाईल. तसेच, रॉयटर्सने दिलेल्या अहवालात असेही स्पष्ट करण्यात आले आहे की, वाढलेले हे दर जूनपर्यंत स्थिर असतील.


चेअर जेरोम पॉवेल यांच्या नेतृत्वाखालील फेडने नमूद केले की आर्थिक वाढ माफक राहिली, परंतु "अलीकडील घडामोडींमुळे घरे आणि व्यवसायांसाठी कठोर पत परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आणि आर्थिक व्यवहार, नोकरभरती आणि चलनवाढ यावर भर पडण्याची शक्यता आहे".


बँकिंग प्रणाली मजबूत 


यूएस फेडरलच्या या बैठकीनंतर, फेड रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल म्हणाले की, बँकिंग प्रणाली मजबूत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, आर्थिक व्यवस्थेतील उलथापालथीमुळे खर्च आणि वाढ या दोन्हींचा वेग मंदावू शकतो. फेड रिझर्व्हच्या या निर्णयामुळे कर्ज अधिक महाग होणार आहे. 


2007 नंतरची सर्वोच्च पातळी


फेड रिझर्व्ह बँक गेल्या 14 महिन्यांपासून फेड रिझर्व्ह बँकेच्या दरात सातत्याने वाढ करत आहे. या वाढीमुळे वाहन कर्जापासून ते क्रेडिट कार्ड कर्ज आणि व्यावसायिक कर्जापर्यंतचे व्याजदर दुप्पट झाले आहेत. फेडरल रिझर्व्हकडून या वाढीपूर्वी व्याज 5 टक्के होते ते आता 5.25 टक्के झाले आहे. 2007 नंतरची ही सर्वोच्च पातळी आहे. 


महत्त्वाच्या बातम्या : 


Share Market Opening 3 May: जागातिक बाजारातील पडझडीचा परिणाम, शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; IT, बँकिंग शेअर्स कोसळले