Share Market Opening on 3 May: जगभरातील आर्थिक मंदीच्या (Economic Recession) वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. बदललेल्या परिस्थितीत घसरणीचा ट्रेंड जगभरातील बाजारपेठांमध्येही दिसून आला. आज बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) आणि एनएसई निफ्टी (NSE Nifty) या दोन्ही प्रमुख देशांतर्गत इडेक्सची सुरुवात घसरणीसह झाली. 


प्री-ओपनमध्ये बाजार घसरला 


आज शेअर बाजारातील व्यवहार सुरू होण्यापूर्वीच देशांतर्गत शेअर बाजारात घसरण होण्याची चिन्ह दिसत होती. सिंगापूरमध्ये NSE निफ्टीचा फ्युचर्स SGX निफ्टी  (SGX Nifty) सकाळी 60 पेक्षा जास्त अंकांनी घसरला होता. यामुळे आज देशांतर्गत बाजाराची सुरुवातही घसरणीसह होऊ शकते, असे संकेत आधीच मिळाले होते. प्रो-ओपन सेशनमध्ये (Pre-Open Session) सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही घसरले. सेशन सुरू होण्यापूर्वी सेन्सेक्स सुमारे 60 अंकांनी तर निफ्टी 30 अंकांनी घसरला होता.


बाजार उघडताच पडझड


दोन्ही प्रमुख इंडेक्सनी आज घसरणीसह व्यवहाराला सुरुवात केली. सकाळी 9:15 वाजता बाजारात व्यवहार सुरू झाला तेव्हा बीएसईचा 30 शेअर्सचा इंडेक्स सेन्सेक्स सुमारे 250 अंकांच्या घसरणीसह 61,100 अंकांच्या जवळ आला. निफ्टीही 85 अंकांनी म्हणजेच सुमारे 0.50 टक्क्यांनी घसरून 18,060 अंकांवर बंद झाला. 


जागतिक बाजारातही घसरण


मंगळवारी अमेरिकन बाजारात मोठी घसरण नोंदवण्यात आली होती. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल एव्हरेज 1.08 टक्के आणि S&P 500 1.16 टक्क्यांनी घसरले, तर टेक फोकस्ड नासडॅक कंपोजिट इंडेक्स 1.08 टक्क्यांनी खाली आला. आजच्या व्यवहारात सर्व आशियाई बाजार घसरले आहेत. 


अमेरिकेतील वाढत्या व्याजदरामुळे जगभरातील बाजारपेठा चिंतेत आहेत. फेडरल रिझर्व्हच्या दोन दिवसीय बैठकीनंतर आज व्याजदर जाहीर होणार असून यावेळीही व्याजदर 0.25 टक्क्यांनी वाढण्याची भीती बाजाराला आहे. याशिवाय, कर्जाची परतफेड करताना अमेरिकन सरकार डिफॉल्टर होण्याची भीतीही बाजाराला सतावत आहे. यामुळेच मंगळवारी कच्च्या तेलाच्या किमतीत 5 टक्क्यांनी घसरण झाली.


आयटी शेअर्स, वित्तीय शेअर्समध्ये पडझड 


आयटी शेअर्स आणि वित्तीय शेअर्समध्ये मोठी घसरण आहे. टेक महिंद्रा, इन्फोसिस, अॅक्सिस बँक, बजाज फिनसर्व्ह, टीसीएस, एचसीएल टेक, आयसीआयसीआय बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स सुरुवातीच्या व्यवहारात सुमारे 1-1 टक्क्यांनी घसरले. आजच्या ट्रेडिंग सत्रात 2,179 शेअर्समध्ये खरेदी झाली, तर 1314 शेअर्समध्ये विक्री झाली आणि 136 शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही.