Investment : शेतकऱ्यांना बचत करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून किसान विकास पत्र योजना (KVP योजना) चालवते. शेतकऱ्यांना गुंतवलेली रक्कम काही महिन्यांत दुप्पट करायची असेल, तर या बचत योजनेत गुंतवणूक करणे हा त्यांच्यासाठी चांगला पर्याय ठरु शकतो. खरं तर, KVP योजनेत गुंतवलेली रक्कम अंदाजे 9.5 वर्षांच्या म्हणजे 115 महिन्यांच्या कालावधीत दुप्पट होते. यामुळेच ज्या लोकांना गुंतवणुकीची रक्कम कमी वेळात दुप्पट करायची आहे, त्यांनी या योजनेत पैसे गुंतवणे फायद्याचे ठरते.


दुसरी खास गोष्ट म्हणजे KVP स्कीम ही पोस्ट ऑफिस स्कीम आहे, त्यामुळे पैसे गमावण्याचा धोका नाही. केंद्र सरकारच्या किसान विकास पत्र योजनेच्या (KVP योजना) नवीनतम अपडेटनुसार, तिचा कार्यकाळ आता 115 महिने म्हणजे 9 वर्षे आणि 5 महिने आहे. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी किमान रक्कम रु 1,000 आहे, तर कमाल गुंतवणुकीची मर्यादा नाही. म्हणजेच या योजनेत तुम्हाला हवे तेवढे पैसे गुंतवू शकतात. पैसे दुप्पट होण्याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही आज एकरकमी रक्कम गुंतवली तर तुम्हाला 115 व्या महिन्याच्या शेवटी दुप्पट रक्कम मिळू शकते. अशा परिस्थितीत ही योजना शेतकऱ्यांना दीर्घकालीन बचत करण्याची संधी देते.


KVP व्याजदर किती?


सरकार किसान विकास पत्र योजना (KVP योजना) वर वार्षिक 7.5 टक्के व्याजदर देते. अशाप्रकारे, जर तुम्ही किसान विकास पत्रामध्ये एकरकमी 5000 रुपये गुंतवले, तर मॅच्युरिटीच्या वेळी ही रक्कम दुप्पट होते. म्हणजेच 10,000 रुपये. ही गुंतवणूकदाराच्या खात्यात हस्तांतरित केली जाते. 


KVP मध्ये गुंतवणूक करण्याची पद्धत आणि आवश्यक कागदपत्रे


किसान विकास पत्रामध्ये गुंतवणूक करणे खूप सोपे आहे. यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडता येते. अर्जदारांनी प्रथम अर्ज प्राप्त करणे आवश्यक आहे म्हणजे फॉर्म A जो पोस्ट ऑफिस किंवा बँकेतून मिळवता येतो.


पूर्ण भरलेला फॉर्म पोस्ट ऑफिस किंवा बँकेत सबमिट करा. तुम्ही एजंटमार्फत KVP मध्ये गुंतवणूक करत असाल, तर एजंटला फॉर्म A1 भरावा लागेल. तुम्ही हे फॉर्म ऑनलाईन देखील डाउनलोड करू शकता. केवायसी प्रक्रिया अनिवार्य आहे आणि तुम्ही आयडी आणि पत्त्याची कोणतीही प्रमाणित प्रत वापरू शकता जसे की पॅन, आधार, मतदार आयडी, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट.
 
यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाईल, त्यानंतर तुम्हाला गुंतवणुकीची रक्कम जमा करावी लागेल. गुंतवणुकीची रक्कम रोख, चेक किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे दिली जाऊ शकते, हे गुंतवणूकदारांनी लक्षात ठेवावे. KVP खात्यात गुंतवणुकीची रक्कम जमा केल्यानंतर, तुम्हाला संबंधित बँक किंवा पोस्ट ऑफिसद्वारे KVP प्रमाणपत्र जारी केले जाते. गुंतवणूकदारांनी ते सुरक्षित ठेवावे, कारण तुम्हाला ते मुदतपूर्तीच्या वेळी जमा करावे लागेल. KVP प्रमाणपत्र ईमेलद्वारे देखील मिळू शकते.


महत्त्वाच्या बातम्या:


Post Office Scheme : 114 महिने पैसे गुंतवा अन् दुप्पट मिळवा; पोस्टाची धमाकेदार योजना, सोबत आकर्षक परतावाही