Success Story : शेतकऱ्यांना सातत्यानं विविध संकटाचा सामना करावा लागतो. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकट येतात. पण अशा संकटाचा सामना करत काही शेतकरी भरघोस उत्पन्न घेत आहेत. बीड जिल्ह्यतील दुष्काळी भागातील एका शेतकऱ्यानं विविध संकटाचा सामना करत ड्रॅगन फ्रूट शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे.
अनिल बडे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन ड्रॅगन फ्रूटची लागवड केली आहे. एकदा ड्रॅगन फ्रूटची बाग लावली की ती दीर्घकाळ टिकते. कमी पाण्यातही ड्रॅगन फ्रूटची लागवड करता येते. त्यामुळे येथील शेतकऱ्यांसाठी ड्रॅगन फ्रूटची लागवड फायदेशीर ठरणार आहे. अनिल हे आजारी होते. त्यांचे ऑपरेशन झाले होते. त्याला पाहण्यासाठी त्याचे काही मित्र उस्मानाबादहून आले होते. त्याने अनिल यांच्यासाठी ड्रॅगन फ्रूट आणले होते. ड्रॅगन फ्रूट पाहिल्यानंतर शेतकरी अनिल यांनी त्याची लागवड करण्याचा विचार केला. त्यानंतर यूट्यूबवर ड्रॅगन फ्रूट बाबतची माहिती पाहिली. त्यानंतर या शेतकऱ्याने 4.5 एकरात ड्रॅगन फूडची लागवड केली.
30 लाख रुपयांचे उत्पन्न
अनिल यांनी दोन वर्षांत ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीतून 30 लाख रुपये कमावल्याचे शेतकरी सांगितले. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागात बीड जिल्ह्याचा समावेश होतो. त्यामुळं येथील शेतकरी आत्महत्या करतात. अनिल या शेतकऱ्याने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ड्रॅगन फ्रूटची लागवड केली आहे. एकदा ड्रॅगन फ्रूटची बाग लावली की ती दीर्घकाळ टिकते. कमी पाण्यातही ड्रॅगन फ्रूटची लागवड करता येते. त्यामुळे येथील शेतकऱ्यांसाठी ड्रॅगन फ्रूटची लागवड फायदेशीर ठरणार आहे.
किती खर्च आला?
अनिल बडे यांची चोपनवाडी गावात 30 एकर जमीन आहे. त्यांनी 27 जून 2021 रोजी अडीच एकरात ड्रॅगन फ्रूटची लागवड केली होती. ज्यामध्ये एकरी 5 लाख रुपये खर्च आला. त्यांनी 10 बाय 7 फूट जागेत 5 हजार रोपे लावली. त्यांना पहिल्या वर्षीच 10 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. यानंतर त्यांनी लागवडीची व्याप्ती वाढवली. याचा त्यांना अधिक फायदा झाला.
चांगला नफा मिळाला
अनिल बडे यांचा मुलगा प्रशांत याने सांगितले की, यावर्षी दोन एकरात दोन आठ हजार ड्रॅगनची रोपे लावली आहेत. ज्यामध्ये जीव अमृतसालरीसोबत शेणखत देण्यात आले आहे. प्रशांतने सांगितले की सध्या आम्ही सुरत, रायपूर, नागपूर आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये ड्रॅगन फ्रूट विकतो. दोन वर्षात 30 लाख रुपयांचा चांगला नफा झाल्याचे शेतकऱ्याने सांगितले.भविष्यात आणखी मोठा नफा अपेक्षित आहे.
ड्रॅगन फ्रूटची लागवड कोणत्या जमिनीत केली जाते?
या शेतकऱ्याची शेती पाहून आता इतर शेतकरीही शेती करून चांगले उत्पन्न मिळवू लागले आहेत. ड्रॅगन फ्रूटला कमलम असेही म्हणतात. आता भारतात मोठ्या प्रमाणावर लागवड केली जात आहे. ड्रॅगन फ्रूट वालुकामय चिकणमाती आणि चिकणमाती जमिनीत घेतले जाते. 5 ते 7 pH पर्यंतची माती त्याच्या लागवडीसाठी योग्य मानली जाते.