Pension Under EPS-95 नवी दिल्ली: भारतात संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ईपीएफओकडून प्रोविडंट फंड, विमा आणि पेन्शन दिली जावी अशी तरतूद आहे. कर्मचारी आणि कंपनी दोघांकडून ईपीएफओमध्ये योगदान देतात. ईपीएफओ ही सरकारी संस्था आहे, याचं नियंत्रण भारत सरकारकडून केलं जातं. संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचं ईपीएफओत योगदान असतं त्यामध्ये पगाराच्या 12 टक्के रक्कम जमा केली जाते. तितकंच योगदान कंपनीकडून केलं जातं. ते दोन भागात विभागलेलं असतं. यातील 8.33 टक्के पेन्शनमध्ये 3.67 टक्के योगदान प्रोविडंट फंडमध्ये केलं जातं. नोकरी सोडल्यानंतर निवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्यांना ईपीएफओकडून पेन्शन दिली जाते. त्याचे काय नियम असतात हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.


ईपीएफओकडून सहा प्रकारची पेन्शन


ईपीएफओनं 1995 मध्ये  एम्पलाइज पेंशन स्कीम सुरु केली होती. संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळतो. यासाठी कर्मचाऱ्यांची वयाची 58 वर्ष पूर्ण होणं आवश्यक असतं किंवा तुम्ही कोणत्या तरी कंपनीत 10 वर्ष सेवा करावी लागेल. ईपीएफओकडून 6 प्रकारच्या पेन्शन दिल्या जातात.  


सुपरन्युएशन पेन्शन


एखादा कर्मचारी 10 वर्ष किंवा अधिक काळ संघटीत क्षेत्रात काम करत असेल तर 58 वर्षानंतर संबंधित कर्मचाऱ्याला सुपरन्युएशन पेन्शनचा लाभ मिळतो. 


58 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी पेन्शन  


एखाद्या कर्मचाऱ्यानं 10 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ नोकरी केली असेल आणि त्यानं 58 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी निवृत्ती घेतली आहे आणि तो नोकरी करत असनेल तर त्याला अर्ली  पेन्शनचा लाभ मिळतो.  


दिव्यांगता पेन्शन


EPS95 च्या नियमानुसार एखाद्या व्यक्तीला एखाद्या संस्थेत काम करताना पूर्णपणे दिव्यंगत्व किंवा काही प्रमाणात दिव्यांगत्व आल्यास ईपीएएफओकडून याचा लाभ दिला जातो. 


विधवा आणि बालकांना पेन्शन


एखाद्या ईपीएपओच्या सदस्याचा अकाली मृत्यू झाल्यास त्या स्थिती त्याच्या पत्नीला आर्थिक मदत केली जाते. ईपीएफओच्या सदस्याच्या जोडीदाराला दरमहा पेन्शन दिली जाते. EPS 95 नुसार दोन मुलांना वयाच्या 25 वर्षांपर्यंत मासिक पेन्शन दिली जाते. त्यांचं शिक्षण आणि पालन पोषण चांगलं व्हावं म्हणून ही पेन्शन दिली जाते.   


अनाथ पेन्शन


एखाद्या ईपीएफओ सदस्याचा आणि जोडीदाराचा मृत्यू झाल्यास त्यांची मुलं अनाथ होतात. आई वडील दोघेही जीवंत नसल्यानं मुलांना ईपीएफओ मुलांना पेन्शन देतं.  


वारसदार पेन्शन


एखाद्या ईपीएफओ सदस्याला पत्नी किंवा मुलं नसतील तर जो वारसदार असेल त्याला पेन्शन दिली जाते. आई आणि वडिलांना वारसदार केलं असेल तर त्यांना विभागून पेन्शन दिली जाते.  


इतर बातम्या :



Investment Plan : वृद्धापकाळाचं सोडा तरुणपणीच होणार मोठा फायदा, NPS गुंतवणूक करा मोठा परतावा मिळवा