Employees Provident Fund: जर तुम्ही नोकरी करत असाल आणि EPFO चे सदस्य असाल तर UAN नंबर तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. परंतु जर तुमचे UAN क्रमांकाशी जोडलेले खाते बंद झाले किंवा चुकीचा खाते क्रमांक टाकला असेल तर टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही. सहजपणे तुम्ही लिंक बँक अकाउंटची माहिती बदलू शकता.ऑनलाईन पद्धतीने तुम्ही घरबसल्या काही मिनिटांतच जोडलेले बँक खाते बदलता येणार आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी सदस्यांना युनिव्हर्सल अकाउंट नंबर नोकरदार लोकांसाठी ईपीएफ खात्यातील गुंतवणूक किंवा प्रॉव्हिडंट फंड ही खूप महत्त्वाची बाब असते. तुमचा पगार तुमच्या हाती येण्याआधीच तुमच्या पीएफचा हिस्सा कापला जातो. तुमच्या रिटायरमेंटनंतरच्या आयुष्यासाठी हा फंड तयार होत असतो. त्यामुळे जर कधी तुमचे खाते बंद झाले किंवा तुम्ही चुकीचे खाते लिंक केले असेल तर ती माहिती तुम्हाला सहज बदलता येणार आहे.
बँक अकाउंट बदलण्याची प्रोसेस
- सर्वात अगोदर तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (Employees' Provident Fund Organisation) च्या nifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या संकेतस्थळाला भेट द्या
- त्यानंतर UAN आणि पासवर्ड टाकून लॉगइन करावे
- संकेतस्थळावरील मॅनेज हा पर्याय निवडत ड्रॉप डाऊन मेन्यू सिलेक्ट करावा
- या मेन्यूमध्ये गेल्यानंतर केवायसी हा पर्याय निवडावा
- त्यानंतर तुमचा बँक अकाऊंट सिलेक्ट करा. अकाऊंट नंबर, नाव, आयएफससी ही खात्याशी संबधित माहिती भरावी
- माहिती अचूक भरल्याची खात्री झाल्यानंतर सेव्ह करावी
- त्यानंतर तुमची माहिती अपडेट होईल
कधी जारी केला जातो UAN क्रमांक?
कर्मचाऱ्यांसाठी UAN नंबर महत्त्वाचा मानला जातो. UAN क्रमांक शेअर न करण्याचा सल्ला दिल जातो. हा बारा आकडी क्रमांक EPFO मध्ये रजिस्टर्ड असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना एकदा देण्यात येतो. जेव्हा कर्मचारी PF अकाऊंट उघडतात त्यावेळी कर्मचाऱ्यांना UAN नंबर जनरेट करण्यात येतो
एकाहून अधिक यूएएन टाळा
जेव्हा तुम्ही दुसऱ्या कंपनीत जाता त्यावेळी सगळ्यात आधी 'फॉर्म 11'ची मागणी करा. ज्यामुळे तुमचा आहे तोच यूएएन कायम राहतो. यामुळे तुमच्या नव्या कंपनीतील पीएफ खातं तुमच्या यूएएनशी जोडलं जाईल. पण त्याआधी तुमचं यूएएन अॅक्टिव्ह झालं आहे याची खात्री करुन घ्या. या http://uanmembers.epfoservices.in/ लिंकवर जाऊन तुम्ही यूएएन अॅक्टिव्ह करु शकता. यामध्ये यूएएन नंबर, मोबाइल नंबर आणि इतर विचारलेली माहिती भरावी. त्यानंतर तुम्हाला एक पिन कोड मिळेल तो भरुन सबमिट करावा. यानंतर पुढील माहिती विचारली जाईल. ती भरावी.