Vivek Kumar Rungta : जगभरात श्रीमंत लोक अनेक गोष्टींचे शौकीन असतात. कोणाला गाड्या आवडतात, तर कोणाला घरं, कोणाला पर्यटन अशा विविध गोष्टींची आवड असते. बडे लोक सातत्यानं नव नवीन गोष्टींची खरेदी करत असता. दरम्यान, विवेक कुमार रुंगटा (Vivek Kumar Rungta) हे देखील भारतातील एक बडे उद्योगपती आहेत. ते विविध गोष्टींमुळं सातत्यानं चर्चेत असतात. विवेक कुमार रुंगटा यांनी आपल्या मुलाच्या 18  वा वाढदिवसाला 5 कोटी रुपयांची सुपर कार (super car) भेट दिली आहे. याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. 


अनेक श्रीमंत उद्योजक त्यांच्या अलिशान जीवनशैलीमुळं चर्चेत असतात. विशेषत: उद्योजक अलीशान कारचे खूप शौकीन असतात. असेत कारचे शौकीन असणारे उद्योगपती म्हणजे विवेक कुमार रुंगटा. त्यांनी आपला मुलगा तरूष याच्या वाढदिवसाला 5 कोटी रुपयांची अलिशान सुपर कार भेट दिली आहे. लॅम्बोर्गिनीच्या UAE युनिटने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर याबाबतची व्हिडीओ अपलोड केला आहे. यामध्ये उद्योजक विवेक कुमार रुंगटा हे आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोळ मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 


माझ्या स्वप्नातील कार, तरुषने माने वडीलांचे आभार


दरम्यान, आपल्या वडिलांनी भेट दिलेल्या कारचा व्हिडीओ मुलगा तरुषने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तसेच कॅप्शनमध्ये माझ्या स्वप्नातील कार भेट देऊन माझा वाढदिवस जादुई केल्याबद्दल तरुषने वडील विवेक कुमार रुंगटा यांचे आभार मानलेत. तुमचे प्रमे माझ्या पाठिशी असल्याचे तरुषने म्हटलं आहे. दरम्यान, हा व्हिडीओ आत्तापर्यंत 1.1 दशलक्षाहून अधिक नागरिकांनी पाहिला आहे. रुंगाटा यांनी त्यांचा मुलगा तरुषला भेट दिलेली कार ही पिवळ्या रंगाची आहे. ही कार लॅम्बोर्गिनी हुराकन एसटीओ आहे. या कारची किंमती पाच कोटी रुपये आहे.  


रोड-रेसिंग कार


सर्वात महत्वाचं म्हणजे ही कार रोड रेसिंग कार आहे. ही कार V10 इंजिनसह सुसज्ज करण्यात आली आहे.  आत्तापर्यंतचे सर्वात शक्तीशाली इंजिन या कारचे तयार करण्यात आले आहे. 5204 cc इंजिन 630 bhp पॉवर आणि 565 न्यूटन-मीटर टॉर्क जनरेट करण्यास सक्षम अशी कार आहे. ही कार केवळ 3 सेकंदात शून्य ते 100 पर्यंतचा वेग वाढवू शकते. ही कार ताशी 310 किमी वेगाने वाहण्यास देखील सक्षम आहे.


महत्वाच्या बातम्या:


Neeta Ambani New Car : कोट्यावधींची किंमत, गाडीवर सोन्याची वस्तू; नीता अंबानींच्या कलेक्शनमध्ये आणखी एका आलिशान कारचा समावेश