Twitter Bird Logo Auction : एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर (Twitter) कंपनी खरेदी केली. मस्क यांनी ट्विटरच्या शेअर्समधील मोठी हिस्सा खरेदी केला. ही ट्विटर डील चांगलीच चर्चेत आली होती. त्यानंतर ट्विटर कंपनीला मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. ट्विटरची मालकी मिळताच मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं यानंतरही ट्विटर कंपनीचं नुकसान काही कमी झालेलं नाही. त्यामुळे आता मस्क यांच्यावर ट्विटरच्या ऑफिसमधील वस्तू विकण्याची वेळ आली आहे. मस्क यांनी टेक फर्मच्या डाऊनटाऊन सॅन फ्रान्सिस्को कार्यालयातून फर्निचर, सजावट, स्वयंपाकघरातील सामान आणि इतर बऱ्याच काही वस्तूंचा लिलाव केला आहे. 18 जानेवारी रोजी, बुधवारी मस्क यांनी ऑफिसमधील ट्विटर 'बर्ड' स्टॅच्यू 1,00,000 डॉलर किमतीला विकला आहे.
ट्विटरच्या ऑफिसमधील वस्तूंचा लिलाव
ट्विटरच्या कॉर्पोरेट ऑफिसच्या मालमत्तेसाठी ऑनलाईन लिलाव आयोजित करण्यात आला होता. हा लिलाव 24 तासांपेक्षा जास्त काळ सुरु होता. या लिलावात ट्विटर बर्ड लोगो असलेले 10-फूट निऑन लाईट ही विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. ही निऑन लाईट 40,000 डॉलर किमतीला विकली गेली. हेरिटेज ग्लोबल पार्टनर्सने हा लिलाव केला होता.
खर्च कमी करण्यासाठी उचललं पाऊलं
या लिलावात 631 व्या लॉटमध्ये एस्प्रेसो मशीन, एर्गोनॉमिक्स डेस्क, टीव्ही, सायकल चार्जिंग स्टेशन, पिझ्झा ओव्हन आणि "@" चिन्हाच्या आकाराचा एक सजावटीच्या वस्तूचा समावेश होता. मस्क यांनी डिसेंबरमध्ये सांगितले की, ट्विटर कंपनीने खर्च कमी करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. येत्या काळातही अनेक मोठे निर्णय घेण्यात येतील.
कर्मचाऱ्यांना काढून टाकणे आवश्यक
मस्क यांनी लाईव्ह चॅट फोरमदरम्यान सांगितले की, ट्विटरच्या अर्ध्याहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणे आवश्यक आहे, कारण कंपनीला दरवर्षी 3 अब्ज डॉलरचे नुकसान झाले असते. मस्क यांनी सांगितले की, त्यांनी 44 अब्ज डॉलर्समध्ये विकत घेतलेल्या ट्विटर कंपनीचा खर्च कमी करण्याचा ते सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. ट्विटरचे सीईओ झाल्यानंतर काही आठवड्यांच्या आतच मस्क यांनी 7,500 कर्मचाऱ्यांपैकी जवळपास निम्म्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले होते.
ब्लू टिकसाठी महिन्याला 900 रुपये मोजावे लागणार
ट्विटरने ब्लू टिक सबस्क्रिप्शनची नवीन किंमत (Twitter Blue) जाहीर केली आहे. अँड्रॉईड युजर्सना आता ब्लू टिकसाठी महिन्याला 11 डॉलर्स म्हणजे जवळपास 900 रुपये मोजावे लागणार आहेत. ही किंमत iOS युजर्ससाठीही हेच दर असणार आहेत. मासिक शुल्काच्या तुलनेत ट्विटरकडून वेब युजर्ससाठी स्वस्त वार्षिक योजना जाहीर करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
Twitter Blue: ट्विटरच्या ब्लू टिकसाठी आता महिन्याला 900 रुपये मोजावे लागणार, ट्विटरची नवी घोषणा