Elon Musk and Parag Agrawal : टेस्लाचे (Tesla) मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर डील (Twitter Deal) रद्द केली आहे. त्यानंतर आता ट्विटर विरुद्ध एलॉन मस्क अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एलॉन मस्क यांनी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी धमकी दिल्याचं वृत्त आहेत. मस्क यांनी पराग यांनी धमकी देणारा मेसेज पाठवला होता. रिपोर्टनुसार हा मेसेज मस्क यांनी 28 जून रोजी पाठवला होता. ही बाब ट्विटरच्या बाजून कोर्टात मांडण्यात आली आहे.


एलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेण्याता 44 अब्ज डॉलरचा करार मोडला. यानंतर ट्विटरने एलॉन मस्क विरोधात कायदेशीर लढाई सुरु कोली आहे. याप्रकरणात दररोज नवनवीन बाबी समोर येत आहे. आता एका रिपोर्टनुसार सांगण्यात येत आहे की, एलॉन मस्क यांनी ट्विटरची मोडण्याआधी सीईओ पराग अग्रवाल यांना धमकावणारा मेसेज पाठवला होता. असं सांगितलं जात आहे की, मस्क यांनी हा मेसेज तेव्हा पाठवला होता, जेव्हा ट्विटरच्या वकिलांनी ट्विटरचं अधिग्रहण करण्याआधी मस्क यांच्या संपत्तीबाबत माहिती मागितली होती.






धमकीच्या मेसेजमध्ये मस्क यांनी काय लिहिलं?
मस्क यांनी एलॉन मस्क यांना पाठवलेल्या मेसेजमध्ये ट्विटर कंपनीचे वकील त्यांच्यासाठी अडचणी निर्माण करत असल्याचं सांगितलं. ही माहिती ट्विटर कंपनीकडून कोर्टात खटला दाखल करते वेळी ही माहिती दिली आहे.


44 अब्ज डॉलरचा निधी कुठून आला?
एलॉन मस्क यांना ट्विटर डील मोडल्यानंतर ट्विटरने कोर्टात धाव घेतली आहे. ट्विटर कंपनीकडून मस्क यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे. याची याचिका दाखल करताना ट्विटरने मस्क यांनी पराग अग्रवाल यांना धमकीचा मेसेज पाठवल्याचं सांगितलं आहे. याशिवास ट्विटरचे सीएफओ नेड सेगल यांनाही मस्क यांनी असाच मेसेज पाठवला होता. ट्विटरच्या वकिलांनी मस्क यांना 44 अब्ज डॉलरचा निधी कुठून आला, अशी विचारणा केल्यानंतर मस्क यांनी मेसेज पाठवला होता.


महत्त्वाच्या इतर बातम्या