Senior Citizens News: देशात वृद्धांची संख्या (Senior Citizens) झपाट्यानं वाढत आहे. 2050 पर्यंत देशातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या 34 कोटी होण्याचा अंदाज एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. म्हणजे वृद्धांची लोकसंख्या वेगानं वाढतेय. ही लोकसंख्या 2050 मध्ये जगाच्या वृद्ध लोकसंख्येच्या 17 टक्के असणार आहे. रिअल इस्टेट कन्सल्टंट फर्म CBRE South Asia Pvt Ltd ने याबाबतची माहिती दिलीय. 


वृद्धांच्या सुविधांच्या मागणीत देखील जोरदार वाढ


सध्या देशात एका बाजूला लोकसंख्येत वाढ मोठी वाढ होताना दित आहे. तर दुसऱ्या बाजूला देशात वृद्धांची लोकसंख्या देखील वेगानं वाढत आहे. वृद्धांच्या वाढत्या लोकसंख्येमुळं वृद्धांच्या सुविधांच्या मागणीत देखील जोरदार वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, जलद वाढणारी वृद्धांची संख्या हा काळजीचा विषय आहे. दरम्यान एकटे राहणाऱ्या वृद्धांच्या लोकसंख्येतही वाढ होताना दिसत आहे. एकटे राहणाऱ्या वृद्धांची लोकसंख्या ही उत्तरेकडील राज्यांपेक्षा दक्षिणेकडील राज्यात जास्त आहे. कारण दक्षिणेकडील राज्यात प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे.


पुढच्या 12 वर्षात वृद्धांची लोकसंख्या 23 कोटीवर पोहचणार


अहवालात दिलेल्या माहितीनुसार, देशातील चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, पुणे आणि एनसीआरमध्ये वृद्ध लोकसंख्येत मोठी वाढ होमार आहे. पुढच्या 12 वर्षात वृद्धांची लोकसंख्या 23 कोटीवर पोहचणार असल्याची माहिती अहवालात देण्यात आलीय. सध्या देशात वृद्ध नागरिकांची संख्या ही 15  कोटी आहे. ही लोकसंख्या 10 ते 12 वर्षात 23 कोटीपर्यंत वाढणार आहे. दरम्यान, वृध्दांच्या वाढत्या लोकसंख्येमुळं विविध सुविधेंच्या मागणीत मोठी वाढ झालीय. 


महत्वाच्या बातम्या:


Loksabha Election : लोकसभेसाठी 97 कोटी मतदार, 2 कोटी नवमतदार अन् 85 वर्षावरील वृद्ध घरातून मतदान करणार!