Reliance : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. या कंपनीत गुंतवणूक केलेले कर्मचारी मालामाल झाले आहेत. मागील आठवडाड्यात शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळाला होता. असे असतानाही सेन्सेक्समधील टॉप 10 कंपन्यांपैकी 6 कंपन्यांनी गुंतवणूकदारांची संपत्ती वाढवली आहे. एकीकडे, मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्समधील गुंतवणूकदारांनी अवघ्या 5 दिवसांत 41000 कोटींहून अधिक कमाई केली आहे. तर टाटा समूहाच्या TCS, HDFC बँक आणि SBI यांना मोठा तोटा सहन करावा लागला.


रिलायन्ससह 6 कंपन्यांना मोठा फायदा


 सेन्सेक्सच्या टॉप-10 कंपन्यांपैकी 6 कंपन्यांनी गेल्या आठवड्यात जोरदार नफा कमावला आहे. यामध्ये मुकेश अंबानींची रिलायन्स कंपनी एक नंबरवर राहिली आहे. तर TCS, HDFC बँक, SBI आणि ICICI बँकेचे बाजारमूल्य घटले आहे.  टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), HDFC बँक, ICICI बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) यांचे मार्केट कॅप एकत्रितपणे 96,605.66 कोटी रुपयांनी घटले आहे. त्याच वेळी, भारती एअरटेल, इन्फोसिस, आयटीसी, एलआयसी आणि हिंदुस्थान युनिलिव्हरसह रिलायन्सचे बाजार मूल्य संयुक्तपणे 82,861.16 कोटी रुपयांनी वाढले. रिलायन्सच्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक फायदा झाला, तर एचडीएफसी बँकेच्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान झाले.


पाच दिवसात 16,93,373.48 कोटी रुपयांची कमाई


मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज या देशातील सर्वात मोठ्या कंपनीचे बाजार भांडवल पाच दिवसात 16,93,373.48 कोटी रुपये झाले आहे. त्यानुसार कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संपत्ती 41,138.41 कोटी रुपयांनी वाढली आहे. यानंतर हिंदुस्तान युनिलिव्हरचे एमसीकॅप (एचयूएल एमसीकॅप) 15,331.08 कोटी रुपयांनी वाढून 5,65,194.18 कोटी रुपये झाले, तर एलआयसी मार्केट कॅप 13,282.49 कोटी रुपयांनी वाढून 5,74,689.29 कोटी रुपये झाले.


 रिलायन्सच्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं


सीएलएसएच्या अंदाजानुसार 2025 या चालू वर्षात अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. त्यामुळं रिलायन्सच्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्याची योग्य वेळ आहे.  2025 मध्ये रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रात वाढ होऊ शकते, रिटेल कारभारात पुन्हा तेजी दिसेल, एअर फायबर सबसक्राइबर्स संख्या वाढू शकते. रिलायन्स जिओचा आयपीओ येणार आहे. सीएलएसएनं रिलायन्स इंडस्ट्रीजच्या स्टॉकचं आउटरपरफॉर्म रेटींग कायम ठेवलं आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरचं टारगेट प्राईस  1650 रुपये असू शकते असा अंदाज सीएलएसएनं वर्तवला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर आता 1250 रुपयांच्या दरम्यान असून त्यापेक्षा 30 टक्के अधिक टारगेट प्राईस वर्तवण्यात आली आहे.  सीएलएएसच्या रिपोर्टनुसार ब्लू-स्काई सिनॅरिओनुसार स्टॉकमध्ये सध्यापेक्षा 70 टक्के तेजी पाहायला मिळू शकते.