Gold and silver Rate : या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या आकडेवारीनुसार, गेल्या शुक्रवारी म्हणजेच 27 डिसेंबर 2024 रोजी, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 76,436 रुपये होती. जी एका आठवड्यानंतर 1,068 रुपयांनी महाग होऊन 77,504 रुपये झाली आहे. चांदीच्या दरातही किरकोळ वाढ झाली आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, 27 डिसेंबर रोजी 1 किलो चांदी 87,831 रुपयांना विकली जात होती. एका आठवड्यानंतर, 3 जानेवारी 2025 रोजी, किमती 290 रुपयांनी महागली आहे. सध्या चांदी प्रतिकिलो 88121 रुपयापर्यंत पोहोचली आहे. तर 23 ऑक्टोबर रोजी चांदीने 99,151 रुपये आणि 30 ऑक्टोबरला सोन्याने 79,681 रुपयांचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता.


2024 मध्ये सोन्याने 20 टक्के आणि चांदीने 17 टक्के परतावा दिला


गेल्या वर्षी म्हणजेच 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत सोन्याच्या किमतीत 20.22 टक्के वाढ झाली होती. 1 जानेवारी 2024 रोजी 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 63,352 रुपये होती, जी एका वर्षात 12,810 रुपयांनी वाढून 76,162 रुपये झाली आहे. त्याचवेळी 1 जानेवारी रोजी, एक किलो चांदी 73,395 रुपयांना विकली जात होती. ज्याची किंमत 12,622 रुपयांनी वाढून वर्षाच्या शेवटच्या दिवशी 86,017 रुपयांवर पोहोचली आहे. एका वर्षात चांदीच्या किमतीत 17.19 टक्क्यांनी वाढ झाली आहे.


सोने खरेदी करताना हॉलमार्कवरून शुद्धता तपासा


सोने खरेदी करताना योग्य ती काळजी घेतली पाहिजे. खरेदी करताना गुणवत्तेशी कोणतीही तडजोड करु नये. हे तपासण्यासाठी हॉलमार्क पाहणे आवश्यक आहे. भारतीय मानक ब्युरो (BIS) द्वारे निश्चित केलेली हॉलमार्क सरकारी हमी देते.


24 कॅरेट सोने हे सर्वात शुद्ध सोने मानले जाते


24 कॅरेट सोने हे सर्वात शुद्ध सोने मानले जाते. पण त्यापासून दागिने बनवता येत नाहीत कारण ते खूप मऊ असतात. दागिन्यांसाठी साधारणपणे 22 कॅरेट सोने वापरले जाते, ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. त्याचवेळी 24 कॅरेट सोन्यावर 999, 23 कॅरेट सोन्यावर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहिले आहे. त्यामुळं सोन्याची खरेदी करताना काळजीपूर्वक खरेदी करा. 


सोन्याच्या भावात वाढ होऊनही सोने खरेदी सुरुच


अहवालात दिलेल्या माहितीनुसार, भारतात सोन्याला संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. जे देशाच्या संस्कृती आणि परंपरेत महत्त्वाची भूमिका बजावते. सोन्याच्या भावात वाढ होऊनही लोकांची दागिने खरेदीची उत्सुकता कमी झालेली नाही. बरेच लोक याला गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय मानतात. सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत असले तरी त्याचा लोकांवर काहीही परिणाम होत नाही. लोकांमध्ये दागिने खरेदीची क्रेझ आहे.