दुबई : दुबई हे आशिया खंडातील खास शहर म्हणून ओळखलं जातं.पायाभूत विकासाच्या दृष्टीने दुबई पॅटर्नची जगभर चर्चा होताना पाहायला मिळते. म्हणूनच या ठिकाणी अनेक देशातील लोक या ठिकाणी मालमत्ता खरेदी करण्यासाठी उत्सुक असतात. दुबईमधील सर्वाधिक 35 हजार मालमत्ता 29700 भारतीयांच्या नावावर आहेत. एका रिपोर्टनुसार संयुक्त अरब अमिरातमध्ये बाहेरच्या देशातील लोकांच्या मालमत्तांचं मूल्य 2022 पर्यंत  160 अब्ज डॉलर पर्यंत पोहोचलं आहे.  दुबई मध्ये अनेक श्रीमंत आणि नामवंत लोकांनी मालमत्तांमध्ये गुंतवणूक केली आहे. 


भारतीयांनंतर पाकिस्तानी लोकांचा नंबर?


पाकिस्तानमधील डॉन वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, दुबईमधील सर्वाधिक मालमत्ता म्हणजेच 35 हजार  मालमत्ता 29700 भारतीयांच्या नावांवर आहेत. भारतानंतर यामध्ये पाकिस्तानचा नंबर येतो. दुबईतील 23 हजार मालमत्ता 17 हजार पाकिस्तानी नागरिकांच्या नावावर आहेत. 


डॉन वृत्तपत्राच्या 'दुबई अनलॉक्ड' नावाच्या आंतरराष्ट्रीय रिपोर्टवर आधारित ही माहिती आहे. अमेरिकेच्या एनजीओ सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड डिफेन्स स्टडीज (COADS) यांच्याकडून डाटा लीक झाला आहे. त्यांनी हा रिपोर्ट नॉर्वेची आर्थिक संस्था E24 आणि ऑर्गनाईज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट  (OCCRP) यांना दिला, जिथून तो डॉनसारख्या जगातील अनेक माध्यम संस्थांपर्यंत पोहोचला.



दुबईमध्ये गुंतवणूक करण्याबरोबरच मालमत्ता  खरेदी करण्यामागे देखील अनेक कारणं दिसून येतात. OCCRP च्या अधिकृत वेबसाइटनुसार लीक झालेला डेटा २०२० ते २०२२ पर्यंतचा आहे. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सी आणि पाश्चात्य देशांमधील मालमत्ता खरेदीवर बंदी टाळण्यासाठी बहुतेक परदेशी लोक दुबईमध्ये मालमत्ता खरेदी करतात. दुबईत अनेकदा विदेशी तपास संस्थांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी आणि पाश्चिमात्य देशांमध्ये संपत्ती खरेदी करण्यासाठी बंदी घातली गेल्यानं लोक दुबईत प्रॉपर्टी खरेदी करतात.



अहवालातील दाव्यानुसार,संयुक्त अरब अमिरातीचे अनेक देशांशी प्रत्यार्पण करार नाहीत. त्यामुळे ते फरार लोकांचे आवडते ठिकाण राहिले आहे. याशिवाय मोठ्या संख्येने लोक गुंतवणुकीची संधी म्हणून लोक दुबईची निवड करतात. OCCRP ने आपल्या अहवालात परदेशी मालकांची तीन श्रेणींमध्ये विभागणी केली आहे. यामध्ये आरोपी, बंदी घातलेले लोक आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांनी घेरलेल्या लोकांचा समावेश आहे. यामुळेच अनेक लोक गुपचूप दुबईमध्ये प्रॉपर्टी खरेदी करतात.


संबंधित बातम्या : 


गोल्ड लोनवर सर्वोत्तम ऑफर देणाऱ्या बँका कोणत्या? सविस्तर माहिती एका क्लिकवर


टोमॅटोची 'लाली' उतरली! ग्राहकांना फायदा मात्र शेतकऱ्यांना फटका, दरात घसरण होण्याची कारणं काय?