D.S.kulkarni : डी.एस.कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड (D.S. Kulkarni Developers Ltd) ही कंपनी पुण्यातील चार बांधकाम व्यावसायिकांन (Pune builders) कवडीमोल भावानं विकत घेतली. मात्र ते ठेवीदारांचे पैसे परत करण्यास तयार नाहीत असा गंभीर आरोप डी एस कुलकर्णी (D.S.kulkarni) यांनी केलाय. 16 हजार कोटींच्या माझ्या मालमत्ता अवघ्या 826 कोटी रुपयांना विकत घेतल्याचा आरोप डीएसके यांनी केलाय. व्ही.टी. पारलेशा, जयंत शहा, अशोक चोरडीया आणि प्रमोद रांका यांनी NCLT मार्फत डीएसके यांच्या मालमत्ता विकत घेतल्याचे त्यांनी सांगितले. 


10 मेपर्यंत या मालमत्ता विकण्यास स्थिगिती


पुण्यातील 4 बांधकाम व्यवसायिकांनी कवडीमोल भावानं माझ्या मालमत्ता हडपल्याचा आरोप डीएसकेंनी केला आहे. माझ्या 16 हजार कोटींच्या माझ्या मालमत्ता अवघ्या 826 कोटी रुपयांना विकल्या असल्याचे ते म्हणाले. डीएसकेंनी व्ही.टी. पारलेशा, जयंत शहा, अशोक चोरडीया आणि प्रमोद रांका या बांधकाम व्यवसायिकांवर गंभीर आरोप केलेत. या व्यवसायिकांनी NCLT मार्फत डीएसके यांच्या मालमत्ता विकत घेतल्या आहेत. त्याविरोधात डीएसके सुप्रीम कोर्टात गेलेत. सुप्रीम कोर्टानं 10 मेपर्यंत या मालमत्ता विकण्यास स्थिगिती दिली असल्याची माहिती डीएसकेंनी दिली आहे. 


अंगावरील कपडे सोडता माझ्याकडं काहीच नाही


दरम्यान, सध्या अंगावरील कपडे सोडता माझ्याकडं काहीच नसल्याचे डीएसकेंनी सांगितलं. माझ्या मालमत्ता तसेच बँक खाती गोठवली आहेत. मी ठेवीदारांचे पैसे परत कसे देऊ असा सवालही त्यांनी केला. 2017 मध्ये एकाच वेळी मला 32 हजार जणांनी पैसे मागितल्याचे कुलकर्णी म्हणाले. मी आयुष्यात कधीही खोट बोललो नाही. माझ्या जमिनी हडप केल्याचा आरोप जीएसकेंनी केलाय.


मला गुंतवणुकदारांचे पैसे परत द्यायचे आहेत


मी दिवाळखोर नाही. मला गुंतवणुकदारांचे पैसे परत द्यायचे आहेत असेही डीएसके म्हणाले. माझ्या सर्व मालमत्ता आणि बँकेची खाती गोठवली आहेत असं कुलकर्णी म्हणाले. सध्या अंगावरील कपडे वगळता माझ्याकडे काहीच नाही असे कुलकर्णी म्हणाले. मला आणखी एक महिन्याचा कालावधी दिला असता, तर सर्व मुद्दे निकाली लागले असते. मी पैसे देत होतो असे डीएसके म्हणाले. मला द्यायला थोडेचे पैसे कमी पडत होते. मला अटक होण्याआधी सर्व बँक खाती गोठवण्यात आली होती. माझ्याविरोधात सर्व ठरवून केल्याचे कुलकर्णी म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या:


Pune: प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी पाच वर्षांनंतर तुरुंगाबाहेर; गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या 800 कोटी रुपयांचं काय?