Dr. Reddy's Laboratories : दिग्गज फार्मा कंपनी असलेल्या डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजची पहिल्या तिमाहीतील आकडेवारी मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर डॉ. रेड्डीजचे शेअर्समध्ये 10 टक्क्यांची घट झाल्याचं दिसून आलं. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजच्या शेअरमध्ये 10 टक्क्यांची घसरण होऊन ते 4,853.20 रुपयांवर बंद झाले. 


डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज च्या पहिल्या तिमाहीतील नफ्यामध्ये एका टक्क्याची घट होऊन तो 570.8 कोटी रुपयांवर आला आहे. गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत हाच फायदा 579 कोटी रुपये इतका होता. पहिल्या तिमाहीत कंपनीच्या उत्पन्नात 11 टक्क्यांची वाढ होऊन ते 4,919 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीचा विचार करता ते उत्पन्न 4,417.5 कोटी रुपये इतकं होतं. मंगळवारी कंपनीने पहिल्या तिमाहीतील आकडेवारी प्रसिद्ध केली. 


कंपनीची ग्रोथ चांगली असून येत्या काळात मार्जिनमध्ये सुधारणा होईल अशी आशी कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली. येत्या काळात नवीन प्रोडक्ट्स चे लॉन्चिंग करण्यात येणार असून त्यामुळे कंपनीच्या नफ्यात भर पडेल असंही त्या अधिकाऱ्याने सांगितलं. युरोपातील कंपनीच्या महसुलात 12 
टक्क्यांची वाढ होऊन तो 399 कोटी रुपयांवर पोहचला आहे.


डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज कंपनीच्या अमेरिकेतील व्यवसायाची गती मंदावली आहे. या भागातील व्यवसायामध्ये अनेक नवीन उत्पादने लॉन्च केल्यानंतरही केवळ 1 टक्क्याची वाढ झाली आहे. 


डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजचा कन्सोलिडेटेड ऑपरेटिंग प्रॉफिटमध्ये 13 टक्क्यांची घट होऊन तो 1,019 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीच्या कन्सोलिडेटेड ऑपरेटिंग मार्जिनमध्ये 5.6 टक्क्यांची घट होऊन तो 20.7 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे कंपनीच्या खर्चात वाढ झाल्याचं दिसून येतंय. 


डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज ही फार्मा क्षेत्रातील एक नावाजलेली कंपनी असून तिच्या पहिल्या तिमाहीतील अंदाजाकडे अनेकांचे लक्ष लागले होते. 


महत्वाच्या बातम्या :