LPG Cylinder Price: देशातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. देशातील घरगुती गॅस सिलेंडरच्या (LPG Cylinder) दरात मोठी घसरण झाली आहे. आजपासून सिलेंडरच्या किंमती 100 रुपयांनी कमी झाल्या आहेत. तीन वर्षांतील नीचांकी पातळीवर या किंमती पोहोचल्या आहेत. घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 900 रुपयांपेक्षा कमी होण्याची ही 30 महिन्यांतील पहिलीच वेळ आहे. देशाच्या मोठ्या महानगरांमध्ये गॅस सिलेंडरच्या किमती किती? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.


आजपासून देशभरात घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 100 रुपयांनी कमी झाली आहे. गेल्या 6 महिन्यांत दुसऱ्यांदा धर कमी झाले आहेत. म्हणजेच घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत 6 महिन्यांत 300 रुपयांनी घट झाली आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती गेल्या 3 वर्षातील सर्वात कमी झाल्या आहेत. 30 महिन्यांपूर्वी ऑक्टोबर 2021 मध्ये गॅस सिलेंडरची किंमत 900 रुपयांपेक्षा कमी होती. 


कोणत्या शहरात गॅस सिलेंडरची किंमत किती?


केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 100 रुपयांची कपात केली आहे. नवे दर आजपासून म्हणजेच शनिवारपासून लागू झाले आहेत. या कपातीनंतर देशाची राजधानी दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 803 रुपये झाली आहे. दुसरीकडे, कोलकातामध्ये घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 829 रुपयांवर आली आहे. मुंबईत घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 802.50 रुपयांवर आली आहे. दुसरीकडे, चेन्नईमध्ये घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 818.50 रुपयांवर आली आहे. गेल्या वेळी 30 ऑगस्ट रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 200 रुपयांची कपात करण्यात आली होती. नोएडामध्ये 14.2 किलोचा एलपीजी गॅस सिलिंडर 800.50 रुपयांना मिळतो. गुरुग्राममध्ये 14.2 किलोचा एलपीजी गॅस सिलेंडर 811.50 रुपयांना, चंदीगडमध्ये 14.2 किलोचा एलपीजी गॅस सिलिंडर 912.50 रुपयांना, जयपूरमध्ये 14.2 किलोचा एलपीजी गॅस सिलिंडर 806.50 रुपयांना, लखनऊमध्ये 14.2 किलोचा एलपीजी गॅस सिलिंडर 840.50 रुपयांना, बंगळुरुमध्ये 14.2 किलोचा एलपीजी गॅस सिलेंडर 805.50 रुपयांना, हैदराबादमध्ये 14.2 किलोचा एलपीजी गॅस सिलेंडर 855 रुपयांना, पाटणामध्ये 14.2 किलोचा एलपीजी गॅस सिलिंडर 892.50 रुपयांना उपलब्ध आहे.


कधी कधी कमी झाल्या होत्या गॅस सिलेंडरच्या किंमती?


25 फेब्रुवारी 2021 रोजी देशाची राजधानी दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 794 रुपये होती. त्यानंतर 9 मार्च रोजी घरगुती गॅस सिलेंडरची सर्वात कमी किंमत दिसली. कारण 1 मार्च 2021 रोजी घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 819 रुपये झाली होती. त्यानंतर सलग तीन महिने घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 809 रुपयांवर राहिली. त्यानंतर त्यात सातत्याने वाढ होत असली तरी तो कधीच 803 रुपयांपर्यंत पोहोचू शकला नाही. तब्बल तीन वर्षानंतर गॅस सिलेंडच्या किंमती कमी पातळीवर पोहोचल्या आहेत. गेल्या वेळी देशाची राजधानी दिल्लीत ऑक्टोबर 2021 मध्ये गॅस सिलेंडरची पातळी 900 रुपयांच्या खाली होती. तेव्हा घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 899.50 रुपये होती. एप्रिल ते ऑक्टोबर 2021 दरम्यान, दिल्लीत घरगुती बेस सिलेंडरच्या किमती 900 ते 800 ते 900 रुपयांपर्यंत होत्या. या काळात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 90.50 रुपयांची वाढ झाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 38 महिन्यांत घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 15 वेळा बदल झाले आहेत. वर्ष 2021 मध्ये, 12 पैकी 9 महिन्यांत गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल दिसून आले. तर 2022 मध्ये हा आकडा केवळ 4 महिन्यांपर्यंत कमी झाला म्हणजेच मार्च 2022, मे 2022 आणि जुलै 2022 मध्ये दोनदा बदल दिसून आला. तर 2023 मध्ये हा बदल फक्त दोनदा झाला. जेव्हा 1 मार्च 2023 रोजी घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 50 रुपयांनी वाढली होती. 


महत्वाच्या बातम्या:


आनंदवार्ता! सीएनजीच्या दरात मोठी कपात, महानगर गॅसने जाहीर केले नवे दर