Airfare Likely To Rise: आगामी काळात हवाई प्रवास (Airfare) महाग होऊ शकतो. कारण डोमेस्टीक हवाई प्रवास भाडे (Domestic Air Travel Fare) निश्चित करण्याचे अधिकार सरकार पुन्हा एअरलाइन्सकडे सोपवणार आहे. याबाबत केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे की, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मे 2020 मध्ये डोमेस्टीक हवाई प्रवास भाडे मर्यादा निश्चित करण्याची सुरुवात झाली होती, ती 31 ऑगस्ट 2022 पासून मागे घेतली जाईल.







नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले की, हवाई इंधनाच्या किमती आणि त्याच दैनंदिन मागणीचा आढावा घेऊन देशांतर्गत विमान प्रवास भाड्यावरील मर्यादा हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे डोमेस्टीक हवाई वाहतुकीत प्रचंड वाढ होण्याची आम्हाला अपेक्षा आहे.


या निर्णयाबाबत माहिती देताना नागरी उड्डाण मंत्रालयाने सांगितले की, देशांतर्गत विमान चालवण्याच्या आणि हवाई प्रवासासाठी प्रवाशांच्या मागणीच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर 31 ऑगस्ट 2022 पर्यंत हवाई भाडे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


 






 


रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यानंतर हवाई इंधनाच्या किमतीत विक्रमी वाढ झाली होती. त्यामुळे विमान कंपन्यांवर आर्थिक बोजा वाढला आहे. तिकिटाचे भाडे ठरवण्याचा अधिकारही त्यांना नव्हता. मात्र, अलीकडच्या काळात हवाई इंधनाच्या किमती कमी झाल्या आहेत.


महत्त्वाच्या बातम्या: