Income tax Saving Tips: अर्थसंकल्पात पगारी नोकरदारांसाठी चांगल्या करसवलती देऊ केल्या आहेत. पाच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पगार नोकरदारांना कलम 87 ए अंतर्गत करदात्याला सरकारकडून कर सवलत मिळते.  पाच लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या पगारी नोकरदारांना पाच टक्के कर आकारला जातो. ज्यामुळं करदात्याला कोणताही कर भरावा लागत नाही. दरम्यान, पाच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या करदात्यांना कोणत्या पद्धतीनं कर वाचवता येईल? यासाठी पुढील महत्वाची ठरणार आहे. 


महत्वाचं म्हणजे,  पाच लाखांहून अधिक वार्षिक उत्पन्न असेलेल्या करदात्यांना कलम 87ए अंतर्गत कोणतीही कर सवलत मिळत नाही. दरम्यान, 50 हजाराच्या स्टँडर्ड डिडक्शनच्या फायद्यानंतरही तुमचे उत्पन्न पाच लाखांहून अधिक होत असल्यास तुम्हाला पाच टक्के कर भरावा लागणार आहे.


पगारी नोकरदारांचे उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त असल्यास त्यांना पाच टक्के कर भरावा लागतो. जर तुमचे उत्पन्न 5 लाख 10 हजार असेल तर, तुम्हाला 14 हजार रुपये कर भरावा लागणार आहे. यावर शिक्षण आणि आरोग्य उपकर वेगळा भरावा लागणार आहे.


महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुम्हाला कर वाचवायचं असल्यास वर्षाच्या सुरुवातीपासून कर नियोजन करणे गरजेचं आहे. कर सवलत मिळतील अशाच ठिकाणी प्रत्येकानं गुंतवणूक करणे आवश्यक आहे. ज्यामुळं पाच लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या लोकांना कर वाचवता येणार आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


हे देखील वाचा- 



आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजार गडगडला; सेन्सेक्समध्ये 1170 अंकाची घसरण


म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा 'हा' नियम ठाऊक आहे का? 15 वर्षात होऊ शकता करोडपती