Diwali Business : सध्या देशभरात दिवाळी (Diwali) सणाचा उत्साह पाहायला मिळत आहे. या दिवाळी सणात देशभरात मोठी उलाढाल होत असते. लोक या दिवाळीच्या सणात विविध वस्तुंची खरेदी करतात. या काळात केलेली खरेदी शुभ मानली जाते. त्यामुळं या सणासुदीच्या काळात बाजारपेठही उजळून निघते. प्रत्येक लहान-मोठ्या व्यावसायिकाला त्याचा लाभ मिळतो. 5 दिवस चालणाऱ्या या सणात लाखो कोटी रुपयांचा व्यवसाय देशात होणार आहे. जाणून घेऊयात या काळात देशभरात नेमका किती व्यवसाय होतो. 


या वस्तू सर्वाधिक विकल्या जाऊ शकतात


या वर्षी दिवाळीत देशभरात 4.25 लाख कोटी रुपयांचा व्यापार होईल, असा अंदाज ऑल इंडिया ट्रेडर्सच्या महासंघाने व्यक्त केला आहे. यावर्षी केवळ मोठ्या शहरांमध्येच नव्हे लहान शहरांमध्ये देखील चांगला व्यवसाय अपेक्षित आहे. या दिवाळीच्या सणात बहुतांश लोक  मोटारी, इलेक्ट्रॉनिक वस्तू इत्यादींवर 25 टक्के खर्च करु शकतात. यानंतर भारतीयांनी अन्न आणि किराणा मालावर 23 रुपये खर्च करणे अपेक्षित आहे. तसेच यावर्षी 9 टक्क्यांपर्यंत खर्च दागिन्यांवर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर कपड्यांवर  12 टक्के, मिठाईवर 4 टक्के, गृहसजावटीवर 3 टक्के, सौंदर्यप्रसाधनांवर 6 टक्के, मोबाईल आणि गॅजेट्सवर 8 टक्के, पूजा साहित्यावर 3 टक्के, 3 टक्के खऱ्च होणार आहे. स्वयंपाकघरातील वस्तू, बेकरी उत्पादनांवर 2 टक्के, भेटवस्तूंवर 8 टक्के आणि फर्निचरसाठी 4 टक्के खर्च केले जाऊ शकतात.


व्यवसायात 1 लाख कोटींची वाढ 


अहवालानुसार, यंदाचा दिवाळीचा व्यवसाय गेल्या वर्षीच्या तुलनेत 1 लाख कोटी रुपयांनी जास्त असू शकतो. 2023 मध्ये सुमारे 3.5 लाख कोटी रुपयांची उलाढाल झाली. सणासुदीच्या काळात मागणीत मोठी वाढ होण्याची अपेक्षा असल्याने व्यापाऱ्यांनी भेटवस्तू, कपडे, दागिने, इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल फोन, फर्निचर, सजावटीचे साहित्य, पूजा साहित्य, रांगोळी, मूर्ती आणि चित्रे अशा विविध वस्तूंचा साठा करण्यास सुरुवात केली आहे. देवता, तयार कपडे, खेळणी, खाद्यपदार्थ, मिठाई, इलेक्ट्रिकल वस्तू, ग्राहकोपयोगी वस्तूंच्या मागणीत मोठी वाढ होते. व्यापारी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध सवलती आणि प्रचारात्मक ऑफरचाही विचार करत आहेत. ग्राहकांना भुरळ घालण्यासाठी 'बाय वन-गेट वन' किंवा विशेष दिवाळी सवलतींसारख्या ऑफर देतात. दिल्ली आणि भारतातील बाजारपेठा दिवाळीसाठी पूर्णपणे तयार आहेत, ई-कॉमर्ससमोरील आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्रियपणे नवीन धोरणांची अंमलबजावणी करत आहेत. या सणासुदीच्या काळात भरीव व्यवसाय साध्य करण्यासाठी सज्ज आहेत.


महत्वाच्या बातम्या:


एका बाजुला सोन्याच्या दरात वाढ, तर दुसऱ्या बाजूला मागणीतही वाढ, नेमकी किती झाली वाढ?