Disney Plans May Cut 4000 Employees : मनोरंजन (Entertainment) क्षेत्रातील दिग्गज कंपनी डिज्नीच्या (Disney Layoffs) जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात नोकरकपात करण्याची शक्यता आहे. डिज्नी कंपनी पुढील महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याच्या तयारीत आहे. जागतिक मंदीच्या भीती डिज्नी कंपनीने ही मोठ्या प्रमाणात नोकरकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. डिज्नी कंपनी एप्रिल महिन्यामध्ये 4000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा विचार करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डिज्नीने कंपनीची पुनर्रचना करण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी हे मोठं पाऊल उचलल्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं आहे.


Disney Layoffs : Disney कंपनी 4 हजार कर्मचाऱ्यांना हटवणार


डिज्नीने सुमारे 4 हजार कर्मचारी कमी करण्याची योजना आखली आहे. बजेट कमी करण्यासाठी कंपनीने हा मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती, बिझनेस इनसाइडरने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. कंपनीने आपल्या व्यवस्थापकांना एप्रिलमध्ये करण्यात येणाऱ्या नोकरकपातीसाठी उमेदवार शॉर्टलिस्ट करण्यास सांगितलं आहे. कंपनी एप्रिल महिन्यामध्ये चार हजार कर्मचाऱ्यांना नारळ देणार आहे. मात्र, कंपनी ही चार हजार कर्मचाऱ्यांची नोकरकपात एकत्र करणार आहे की, लहान तुकड्यांमध्ये कर्मचाऱ्यांना हटवणार आहे, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. 


Disney Layoffs : 'या' कारणामुळे घेतला नोकरकपातीचा निर्णय


बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, डिज्नी कंपनी 3 एप्रिल रोजी होणाऱ्या वार्षिक बैठकीपूर्वी नियोजित नोकरकपातीची घोषणा करण्याची शक्यता आहे. बिझनेस इनसाइडरने सूत्रांच्या हवाल्याने एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, डिज्नी कंपनीने कर्मचारी कपात करण्याची घोषणा केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी आर्थिक मंदीच्या सावटाखाली भविष्यातील उपाययोजनांची तयारी करत आहे. यासोबतच कंपनी पुर्नरचना करून खर्चही कमी करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे कंपनीने सुमारे चार हजार कर्मचाऱ्यांना हटवण्याचा निर्णय घेतला आहे. 


Disney Layoffs : आर्थिक मंदीच्या भीतीमुळे कर्मचाऱ्यांना फटका


या आधी कंपनीने सुमारे सात हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली होती. जागतिक आर्थिक मंदीच्या भीतीमुळे सर्व क्षेत्रातील कंपन्यांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे जगभरातील अनेक कंपन्यांनी नोकरकपात (Layoff) करत आहेत. अशातच आता Disney या कंपनीनं देखील कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चार हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याचा निर्णय Disney या कंपनीनं घेतलं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Wipro Layoff : दिग्गज आयटी कंपन्यांकडून नोकरकपात सुरुच, विप्रोकडून 120 कर्मचाऱ्यांना नारळ