Jeevan Pramaan Patra Submission Deadline :  जर तुम्ही सुद्धा पेन्शन घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. नियमानुसार  पेन्शनधारकांना (pensioners) नोव्हेंबरबरोबरच ऑक्टोबरमध्ये  जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) जमा करण्याची सवलत दिली आहे. त्यामुळे आता तुम्हाला आताऑक्टोबर महिन्यात देखील तुमचे जीवन प्रमाणपत्र जमा करता येणार आहे. थोडक्यात या निर्णयामुळे हयातीच दखल जमा करण्यासाठी दोन महिन्यंचा कालावधी देण्यात आलाआहे. 


सर्व निवृत्त कर्मचार्‍यांसाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिना महत्त्वाचा असतो. केंद्र सरकारच्या पेन्शन आणि पेन्शन कल्याण विभागाने (Department of Pension and Pensioners’ Welfare-DoPPW) म्हटले आहे की, 80 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक जास्त वय असणाऱ्या पेन्शनधारकांच आता 1 नोव्हेंबर ऐवजी 1 ऑक्टोबरपासून आपले जीवन प्रमाणपत्र जमा करता येणार आहे.  पेन्शनधारकांचा विचार करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. 


DOPPW  ने दिलेल्या माहितीनुसार पेन्शनधारकांना बँकेच्या किंवा पोस्टाच्या घरपोच सेवेमार्फत देखील आपले जीवन प्रमाणपत्र जमा करता येणार आहे. तसेच पेन्शनधारक जेपी पोर्टलवर जाऊन देखील अर्ज  (DLC) दाखल करू शकता. 


ऑनलाईन जीवन प्रमाणपत्र कसे जमा करावे?



  • जीवन प्रमाणपत्र किंवा लाईफ सर्टिफिकेट  तुम्हाला ऑनलाईन देखील जमा करत येणर आहे

  • ऑनलाईन जमा करण्यासाठी तुम्ही  https://jeevanpramaan.gov.in/  या संकेतस्थळाला भेट द्या

  • तुम्ही बायोमॅट्रिक किंवा ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून ओळख पटवण्यासाठी बोटाचे ठसे सादर करा

  •  पडताळणी केल्यानंतर जीवन प्रमाण पोर्टल नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एसएमएस पाठवावे ज्यात लाइफ सर्टिफिकेट आयडी असेल.

  • त्यानंतर तुम्ही ईमेल आयडी किंवा अॅपच्या माध्यमातून तुमचे लाईफ सर्टिफिकेट 


ही कागपत्रे आवश्यक



  • आधार कार्ड  (Aadhaar Card)

  • मोबाईल क्रमांक  (Mobile Number)

  • बँक खात्याची माहिती Bank Details)

  • पेन्शन मंजूर झाल्याची कागदपत्रे


30 नोव्हेंबरपर्यंत आपला हयातीचा दाखला म्हणजेच जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) जमा करावे लागेल. जर असे केले नाही, तर त्यांची पेन्शन थांबवली जाईल. Life Certificate जमा केल्यानंतर तुमची पेन्शन सुरू राहिल. 


संबंधित बातम्या :