Share Market Opening: शेअर बाजारातील व्यवहाराची आज सावधपणे सुरुवात झाली असल्याचे चित्र आहे. भारतीय शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात होण्याआधी आशियाई बाजारात (Asian Share Market) संमिश्र ट्रेंड असल्याचे दिसून आले. त्याचा फारसा फायदा भारतीय शेअर बाजाराला झाला (India Share Market) नाही. शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात सपाट झाली. बाजार आजही अस्थिर राहण्याची शक्यता आहे.
आज बाजारातील व्यवहार सुरू झाले तेव्हा खरेदीचा जोर दिसण्याचे संकेत दिसत होते. शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात संमिश्र झाली. सेन्सेक्समध्ये किंचीत घसरण दिसून आली. बाजारात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 23 अंकांनी घसरत 57,403 अंकावर आणि निफ्टी 8 अंकांनी वधारत 17,102 अंकांवर खुला झाला. सकाळी 9.30 वाजता सेन्सेक्स 173 अंकांच्या घसरणीसह 57,253.84 अंकावर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 43 अंकांच्या घसरणीसह 17,050.60 अंकांवर व्यवहार करत होता.
आज बँक निफ्टीत घसरण दिसून आली. आयटी निर्देशांकातही 0.4 टक्क्यांची घसरण दिसून आली. मेटल शेअर्सवर आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा परिणाम दिसत असून घसरण सुरू आहे. मीडिया, फार्मा, रियल्टी, हेल्थकेअर आणि ऑईल अॅण्ड गॅस सेक्टरच्या शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे.
निफ्टीत, ओएनजीसीच्या शेअर दरात 5.28 टक्के, एनटीपीसीमध्ये 2.04 टक्के, अपोलो रुग्णालयात 1.86 टक्के, कोल इंडियात 1.60 टक्के आणि बीपीसीएलमध्ये 1.35 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. त्याशिवाय, सिप्ला, रिलायन्स इंडस्ट्रीज, यूपीएल आणि सन फार्माच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे.
हिंदाल्को, टायटन, जेएसडब्लू स्टील, मारुती, अदानी एंटरप्राइजेस आदी शेअरमध्ये घसरण दिसून येत आहे. इंडसइंड बँकेतही एक टक्क्यांची घसरण दिसून येत आहे.
शुक्रवारी बाजारात तेजी
शुक्रवारी, रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.50 टक्क्यांची (RBI Hikes Repo Rate) वाढ केल्यानंतरही भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली. आरबीआयने पतधोरण जाहीर केल्यानंतर बँकिंग शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 1016.96 अंकांनी वधारत 57,426.92 अंकांवर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 276.20 अंकांच्या तेजीसह 17,094.30 अंकांवर बंद झाला.
इतर महत्त्वाच्या बातम्या: