DDA Housing scheme : दिल्ली विकास प्राधिकरण (DDA) ची उत्सव विशेष गृहनिर्माण योजना-2023 मध्यमवर्गीयांसाठी वरदान ठरली आहे. तुमचे जर दिल्लीच्या हद्दीत स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न साकार करायचे असेल, तर डीडीएची ही योजना तुमच्यासाठी उपयुक्त ठरु शकते. यावेळी मध्यमवर्गीयांना डोळ्यासमोर ठेऊन या योजनेत 19000 हून अधिक फ्लॅट ऑफर करण्यात आले आहेत. म्हणजेच तुमचे उत्पन्न कमी असले तरी तुम्ही हे फ्लॅट खरेदी करु शकता.


यावेळी दिल्ली विकास प्राधिकरणाच्या गृहनिर्माण योजनेत कमी उत्पन्न असलेल्या लोकांवर आणि मध्यमवर्गावर पूर्ण लक्ष देण्यात आले आहे. या योजनेत सुमारे 30,000 फ्लॅट्स आहेत. त्यापैकी 19,000 म्हणजे अर्ध्याहून अधिक फ्लॅट्स LIG श्रेणीतील आहेत. त्यांची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. दिल्ली विकास प्राधिकरणाच्या या योजनेत सुमारे 30 ते 32 हजार फ्लॅट्सची ऑफर देण्यात आली आहे. यामध्ये आर्थिक दुर्बल विभाग (EWS) श्रेणी, निम्न उत्पन्न गट (LIG), मध्यम उत्पन्न गट (MIG), उच्च उत्पन्न गट (HIG), अतिउच्च उत्पन्न गट (SHIG) आणि पेंट हाऊस यांचा समावेश आहे. या योजनेत जास्त किंमतीचे फ्लॅट वगळता इतर फ्लॅटचे बुकिंग 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य' तत्त्वावर केले जात आहे.


मध्यमवर्गीयांसाठी किती घरे?


मध्यमवर्गाला लक्षात घेऊन, DDA ने आपल्या गृहनिर्माण योजनेत एकूण 19,996 LIG फ्लॅट्स देऊ केले आहेत. द्वारका सेक्टर-14 मध्ये बांधलेल्या 316 घरांची किंमत 70 लाखांपेक्षा जास्त असली, तरी सुमारे 19680 घरांची किंमत अतिशय वाजवी आहे. म्हणजे ही घरं स्वस्तात विकत घेता येतील. द्वारका व्यतिरिक्त, डीडीएने नरेला परिसरात बहुतेक एलआयजी घरे विकसित केली आहेत. LIG फ्लॅट 1BHK च्या समतुल्य आहेत. त्यांना ‘पब्लिक फ्लॅट’ असेही म्हणतात. या सर्व फ्लॅटचे क्षेत्रफळ सुमारे 60 यार्ड (49.9चौरस मीटर) आहे. DDA ने नरेला सेक्टर G2 च्या पॉकेट 1,3,4,5,6 मध्ये एकूण 7,913 LIG फ्लॅट तयार केले आहेत. तर सेक्टर G7 च्या पॉकेट 6,7,11 मध्ये 11,767 फ्लॅट तयार आहेत.


LIG फ्लॅटची किंमत 25 लाखांपर्यंत 


डीडीएचे एलआयजी फ्लॅट खूप स्वस्त आहेत. नरेलाच्या सेक्टर G2 मध्ये बांधलेल्या LIG फ्लॅटचे दर 20.90 लाख ते 21 लाख रुपयांच्या दरम्यान आहेत. सेक्टर G7 मध्ये बांधलेल्या फ्लॅट्सची अंदाजे डिस्पोजल किंमत 25.2 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. एलआयजी फ्लॅट बुक करण्यासाठी एक लाख रुपये द्यावे लागतील.


महत्त्वाच्या बातम्या:


तुमच्या स्वप्नातील घर झालं स्वस्त, सिमेंटसह सळईच्या दरात झाली एवढी घट