Home Construction: सिमेंट (cement) आणि सळईच्या (sariya) किंमती कमी झाल्या आहेत.  त्यामुळं आपल्या स्वप्नातील घर बांधण्याची हीच योग्य संधी आहे. दोन महिन्यांत सिमेंटच्या किंमतीत वाढ झाली होती. मात्र, या चालू नोव्हेंबरमध्ये त्याची किंमत कमी झाली आहे. सळईच्या किंमती जवळपास 1000 रुपयांनी कमी झाल्या आहेत.


आता स्वप्नातील घर बांधण्याची चांगली संधी आहे. कारण नोव्हेंबर महिन्यात सळई आणि सिमेंटच्या किंमतीत घसरण झाली आहे. या दोन्ही गोष्टी घर बांधण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. शिवाय यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात. आता त्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. त्यामुळं तुम्ही पूर्वीपेक्षा कमी पैसे खर्च करुन तुमच्या स्वप्नातील घर बांधू शकता.


सिमेंट आणि सळईचे का पडले?


नोव्हेंबर महिन्यात दिवाळी, दसरा यांसारखे सण आले होते. अनेक राज्यांतील निवडणुकांमुळे घर बांधण्याची योजना रखडल्या होत्या. त्यामुळं सिमेंट आणि सळईचे उत्पादन कमी केले होते. तसेच उत्पादनाच्या मागणीत देखील घट झाल्याने सिमेंट आणि सळईच्या किंमतीत घसरण झाली आहे. मात्र, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये सिमेंटच्या दरात सुमारे 20 टक्के वाढ दिसून आली होती.


आता सिमेंटचा भाव किती?


देशातील सिमेंटच्या किंमतीबद्दल (सिमेंट प्राइस अपडेट) बोवायचे झाले तर 50 किलोच्या पिशवीचा सरासरी दर 382 रुपये आहे. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ही किंमत अजूनही 5 टक्क्यांनी जास्त आहे. डिसेंबर महिन्यात त्याची किंमत आणखी वाढू शकते. मात्र, सणासुदीच्या काळात दिल्ली-एनसीआरमध्ये बांधकाम कमी झाली आहेत. तर बिहार आणि झारखंडमध्ये घरे बांधण्याचा खर्च वाढला आहे. तर पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये घरबांधणी उत्पादनांमध्ये घसरण झाली आहे.


दोन-तीन महिन्यांत सिमेंटच्या दरात मोठी वाढ 


गेल्या दोन-तीन महिन्यांत ईशान्येकडील राज्यांमध्ये सिमेंटच्या किंमतीत झपाट्यानं वाढ झाली आहे. तर दक्षिण भारतात सिमेंटच्या किमती 396 रुपये प्रति बॅग या आतापर्यंतच्या उच्चांकावर पोहोचल्या होत्या. मात्र, दसरा आणि इतर सणांच्या काळात मागणी कमी असल्यानं किंमतीत काही प्रमाणात वसुली झाली आहे. याशिवाय, निवडणुकांमुळं मध्य प्रदेशसारख्या ठिकाणी बांधकामे कमी झाली असून सिमेंट आणि सळई यासारख्या वस्तूंच्या किंमती घसरल्या आहेत. 


नोव्हेंबरमध्ये सळईच्या किंमती झाल्या कमी


नोव्हेंबरच्या सुरुवातीपासूनच सळईच्या किंमतीत घट झाली आहे. 2 नोव्हेंबर 2023 रोजी कानपूरमध्ये सळईची किंमत 47,000 रुपये प्रति टन होती, तर 21 नोव्हेंबर रोजी सळईची किंमत 46 हजार रुपये झाली. त्याचप्रमाणे, मुझफ्फरनगर, बिहारमध्ये 2 नोव्हेंबरला एक टन सळईची किंमत 46,800 रुपये होती, ती 21 नोव्हेंबरला 45,800 रुपयांवर आली. दुर्गापूरमध्ये सळईचा भाव 1000 रुपयांनी घसरला असून तो 44,000 रुपये प्रति टन झाला आहे. रायपूरमध्ये एक टन सळईची किंमत 200 रुपयांनी कमी झाली असून येथे एक टन सळई 44,500 रुपयांना विकली जात आहे. तर दिल्लीत 21 नोव्हेंबर रोजी एक टन सळईची किंमत 500 रुपयांनी कमी होऊन 46,800 रुपये प्रति टन झाली आहे.


तुमच्या शहरातील सळईचे दर कसे तपासायचे? 


सळईचे दर दररोज बदलतात. आयरनमार्ट (ayronmart.com) या वेबसाइटवर तुम्हाला सळईच्या किंमतीतील बदलांची माहिती मिळू शकते. तुम्ही तुमच्या शहरातील सळईचे दर येथे शोधू शकता. हा दर 18 टक्के जीएसटीशिवाय आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Adani Cement Biz : सिमेंट उद्योगात अदानी करणार धमाका, 'या' कंपनीची करणार खरेदी