Bitcoin latest price:  जगातील टॉप 10 पैकी बहुतांशी क्रिप्टोकरन्सीच्या किमतींमध्ये मागील 24 तासात मोठी घसरण झाली आहे. जगातील सर्वात जुनी आणि लोकप्रिय असलेल्या बिटकॉइन या क्रिप्टोकरन्सीमध्ये  तीन टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. क्रिप्टो एक्सचेंज वजीरएक्सनुसार (WazirX) दुपारी एक वाजेपर्यंत बिटकॉइन  3.34 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. बिटकॉइनची किंमत 43,497 डॉलर म्हणजे जवळपास 34,21,503 रुपयांवर ट्रेड करत होता. 


नोव्हेंबरच्या सुरुवातीला बिटकॉइनच्या किंमतीने 68,000 डॉलरचा टप्पा ओलांडला होता. मात्र, त्यानंतर क्रिप्टोच्या दरात घट झाली आहे. बुधवारी, बीएनबी (BNB)आणि कार्डानो (Cardano) या चलनाच्या दरात मोठी घट झाली. इथरियम हे चलन 2.76 टक्क्यांनी घसरून 3,084.26 डॉलर या दरावर ट्रेड करत होता. बीएनबी 5.11 टक्क्यांनी घसरला आणि 411 डॉलरवर ट्रे़ड करत होता. कार्डानोमध्ये 5.73 टक्क्यांनी घसरण झाली. या क्रिप्टोचा दर 1.16 डॉलरवर होता. 


डॉगकॉइनमध्ये घसरण 


Solana मध्ये 4.18 टक्के, Tera मध्ये 3.86, XRP आणि USD Coin मध्येही घसरण नोंदवण्यात आली आहे. Polkadot आणि Dogecoin मध्ये घसरण नोंदवण्यात आली. जगातील 12 वी सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी डॉगकॉइनमध्ये 5.37 टक्के घसरण झाली असून 12.35 रुपयांवर ट्रेड करत आहे. त्याशिवाय, मीम करन्सी शीबा इनूमध्ये 7.75 
टक्के घसरण झाली आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha