Adani Wilmar Share Price Upper Circuit : अदानी समूहाची कंपनी अदानी विल्मरला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शेअर बाजारात मंगळवारी सूचीबद्ध झालेल्या अदानी विल्मरच्या शेअरमध्ये आज बुधवारी 20 टक्क्यांची उसळण घेतली. आयपीओमध्ये शेअर मिळालेल्या गुंतवणूकदारांना दोन दिवसात 5500 चा फायदा झाला आहे. 


बुधवारी,  शेअर बाजार सुरू झाला तेव्हा सेन्सेक्स आणि निफ्टी वधारले होते. बाजारातील व्यवहार सुरू होताच स्टॉक 10 टक्क्यांनी वधारला. त्यानंतर सकाळी 10.15 वाजण्याच्या सुमारास अदानी विल्मरचा स्टॉक 18 टक्क्यांनी वधारून 313.05 रुपयांवर पोहचला होता. त्यानंतर लागलीच शेअर 20 टक्क्यांनी वधारला आणि अप्पर सर्किट लागले. मंगळवारी शेअर बाजारात अदानी विल्मर स्टॉक लिस्ट होताना चार टक्क्यांच्या डिस्काउंटवर 221 रुपये प्रति शेअर दरावर लिस्ट झाला होता. त्यानंतर शेअरमध्ये चांगली खरेदी होऊ लागल्याने दिवसअखेर जवळपास 16 टक्क्यांनी वधारला आणि 265.20 रुपयांवर बंद झाला. 


गुंतवणूकदारांची कमाई 


अदानी समूहाच्या या शेअरने गुंतवणूकदारांना चांगली कमाई करून दिली आहे. आयपीओमध्ये एक लॉट मिळालेल्या गुंतवणूकदाराचा 5500 रुपयांचा फायदा झाला आहे. कंपनीच्या आयपीओत एका लॉटमध्ये 65 शेअर होते. 


शेअर बाजारात तेजी 


मागील काही सत्रात घसरण सुरू असणारा शेअर बाजार आज वधारला आहे. बुधवारी शेअर बाजाराने चांगली सुरुवात केली. प्री-ओपनिंगपासून सकारात्मक संकेत देणारा शेअर बाजार व्यवहार सुरु होताच 0.60 टक्क्यांनी वधारला. आज सेन्सेक्स, निफ्टीत चांगली खरेदी होण्याची शक्यता आहे. 


प्री-ओपन सेशनमध्ये सेन्सेक्स 350 अंकांनी वधारला. बाजारातील व्यवहार सुरू होताच किंचीत घसरण झाली. मात्र, बाजार पुन्हा 330 अंकांनी वधारत 58,100 अंकावर पोहचला होता. त्यानंतर सेन्सेक्स 539 अंकांनी वधारला होता. निफ्टीदेखील वधारला होता. निफ्टी 17,380 अंकांवर ट्रेड करत होता. 


जागतिक बाजारपेठांमधील तेजीचा परिणाम भारतीय बाजारपेठांवर दिसून आला. आशियाई बाजारपेठा देखील तेजी दिसून आली. सिंगापूरमधील इंडेक्स SGX Nifty देखील वधारला होता. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: