Pension Facility : पेन्शनधारकांना पेन्शनसंबंधी कोणतीही माहिती पाहिजे असेल, तर त्यासाठी आता पेन्शन कार्यालयात चकरा माराव्या लागणार नाहीत. पेंन्शनधारकांसाठी सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पेन्शनधारकांना आता पेंन्शन अर्ज भरण्यापासून ते पेन्शन खात्यावर जमा होईपर्यंतची सर्व माहिती घरबसल्या मिळणार आहे. दिल्ली सरकारमधील समाज कल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी याबाबत माहिती दिली आहे.
दिल्ली सरकार पेन्शनसंबंधीची सर्व प्रक्रिया ऑनलाईन करत आहे. त्यामुळे पेन्शनधारकांना आता पेन्शन कार्यालयाच्या चकरा माराव्या लागणार नाहीत. जेष्ठ नागरिकांना आता डिजिटल स्वरूपात पेन्शन मिळणार आहे. दिल्लीच्या केजरीवाल सरकराच्या या निर्णयामुळे भ्रष्टाचार रोखण्यासही मदत होईल असे जाणकारांचे मत आहे.
दिल्ली सरकारने राष्ट्रीय सामाजिक निवृत्ती वेतन योजना दिल्लीत लागू केली आहे. या योजनेअंतर्गत दिल्लीत आता डिजिटलस्वरूपात लाभधारकांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत. यासोबतच पेन्शनधारकांना सर्व सुविधा आता ऑनलाईन मिळणार आहेत. याची सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध राहणार असून ही माहिती घरबलल्या पेन्शनधारकांना मिळणार आहे. पेन्शधारकांची रक्कम आता थेठ लाभधारकांच्या खात्यात जमा होणार आहे, त्यामुळे भ्रष्टाचार थांबण्यास मदत होईल.
दिल्ली सरकारच्या या योजनेमुळे पेन्शधारकांना पेन्शन स्टेटस घरी बसून मोबईलच्या मदतीने चेक करता येणार आहे. याबरोबरच खात्यावर पेन्शन जमा झाली आहे की नाही हे पण घरबसल्या पाहता येणार आहे.
राष्ट्रीय सामाजिक निवृत्ती वेतन योजनेच्या माध्यमातून पेन्शनधारक नेट बँकिंग किंवा ज्या बँकेत लाभधारकाचे खाते आहे त्या बँकेच्या अॅपच्या मदतीने खात्यावर पेन्शनची रक्कम जमा झाली की नाही हे पाहता येणार आहे. याबरोबरच बँकेच्या ग्राहक सुविधा केंद्रात फोन करून एटीएम कार्डच्या मदतीने बॅंकेचे पासबुक अपडेट करता येणार आहे. त्यामुळे पैसे खात्यावर जामा झाले की नाही हे पाहणे शक्य होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
लहान मुलांनाही मिळतेय पेन्शन, EPFO नं सांगितलं कधीपर्यंत मिळणार आर्थिक मदत?
'भारत छोडो' चळवळीतील स्वातंत्र्यसैनिकाच्या विधवा पत्नीची व्यथा, तब्बल 56 वर्षे पेन्शन रोखली; राज्य सरकारवर हायकोर्टाचे ताशेरे