Petrol Diesel Prices To Shoot Up : होळीच्या सणाला आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. अशातच होळीच्या दिवशी देशवासीयांना महागाईचा मोठा फटका बसू शकतो. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रचंड वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रशिया आणि युक्रेनमधील तणाव आणि युद्धाच्या शक्यतेमुळे क्रूड ऑईलच्या किमती वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय ऑईल बाजाराने सप्टेंबर 2014 नंतरची सर्वोच्च पातळी गाठली आहे. मंगळवारी क्रूड ऑयलच्या किंमतीने प्रति बॅरल 97 डॉलरची मर्यादा ओलांडली आहे. आता लवकरच क्रूड ऑईलची किंमती प्रति बॅरल 100 डॉलरवर जाण्याची शक्यता आहे.
क्रूड ऑईलच्या किंमत आणखीन वाढणार
नवीन वर्ष 2022 मध्ये क्रूड ऑईल किंमतीत 20 टक्क्यांहून अधिकची वाढ झाली आहे. मागील दोन महिन्यांपासून सातत्याने क्रूड ऑईलचे दर वाढत आहेत. 1 डिसेंबर 2021 रोजी क्रूड ऑईलची किंमत प्रति बॅरल 68.87 डॉलर इतकी होती. जी आता प्रति बॅरल 97 डॉलर इतकी झाली आहे. म्हणजेच दीड महिन्यात कच्च्या तेलाच्या किमती खालच्या पातळीपासून ते आतापर्यंत 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल नाही
आंतरराष्ट्रीय ऑईल बाजारात जरी क्रूड ऑईलची किंमत वाढली असली, तरी देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. 4 नोव्हेंबर 2021 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत असून 10 मार्चला निकाल लागणार आहेत. निवडणुकीत नुकसान होऊ नये म्हणून क्रूड ऑईलच्या किमतीत प्रचंड वाढ होऊनही सरकारी तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करत नसल्याचे मानले जात आहे. दरम्यान, निवडणुकीनंतर तोटा भरून काढण्यासाठी सरकारी तेल कंपन्या निश्चितपणे दर वाढवतील. तसेच कच्च्या तेलाच्या किमतींवर नजर ठेवणाऱ्या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांनुसार, कच्च्या तेलाच्या किमती आणखी वाढू शकतात. जे मॉर्गन यांनी सांगितलं आहे की, 2022 मध्ये क्रूड ऑईलची किंमत 125 प्रति बॅरल इतकी होईल. तर 2023 मध्ये हीच किंमत 150 डॉलर प्रति बॅरल होण्याची भविष्यवाणी त्यांनी केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: