KL Rahul New Home : भारतीय क्रिकेट संघातील धडाकेबाज फलंदाज केएल राहुलने (KL Rahul) मुंबईत एका अलिशान घराची खरेदी केली आहे. राहुलने वांद्रे परिसरात नवीन आलिशान अपार्टमेंट खरेदी केलं आहे. खरेदी केलेलं नवीन अपार्टमेंट हे वांद्र्याच्या पाली हिलमधील (Pali Hill Bandra) एका इमारतीत आहे. यासाठी राहुलने तब्बल 20 कोटी रुपये मोजले आहेत. वांद्रे भाग हा मुंबईतील (Mumbai) सर्वात पॉश परिसर समजला जातो. कारण याच भागात अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी राहतात.


घराच्या खरेदीसाठी केएल राहुलने भरले 1 कोटी 20 लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क


सध्या बॉलीवूड कलाकार देखील मुंबईत मोठ्या प्रमाणात मालमत्तांची खरेदी करताना दिसत आहेत. अशातच आता क्रिकेटपटू देखील यामध्ये मागे नसल्याचे दिसून आले आहे. क्रिकेटपटू केएल राहुलने आता मुंबईतील वांद्रे परिसरात अलिशान घर खरेदी केलं आहे. पाली हिलमधील एका 18 मजली इमारतीत राहुलने हे घर खरेदी केलं आहे. या घराचे क्षेत्रफळ हे 3350 चौरस फुट आहे. या घराच्या व्यवहारासाठी केएल राहुलने 1 कोटी 20 लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले आहे. 15 जुलैला या घराची नोंदणी झाल्याची माहिती मिळाली आहे. 


वांद्रे हा मुंबईतील पॉश परिसर 


सुनील शेट्टीची लाडकी लेक अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि जावयी के एल राहुल आता मुंबईकर झाले आहेत. या दोघांनी मुंबईतील वांद्रेत आलिशान घर घेतलं आहे. वांद्रे हा मुंबईतील सर्वात पॉश परिसर आहे. याठिकाणी अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी राहतात. शाहरुख खान, सलमान खान, टायगर श्रॉफ, रणबीर कपूर, आलिया भट्ट, सैफ अली खान यासारखे अनेक बॉलीवूड कलाकार याच भागात राहतात. आता, अथिया शेट्टी आणि केएल राहुल या सेलिब्रिटींचे शेजारी होणार आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी बॉलीवूड अभिनेता आमिर खानने पाली हिलमध्ये अपार्टमेंट खरेदी केले आहे. आमिरने पाली हिलमध्ये खरेदी केलेली मालमत्ता रेडी-टू-मूव्ह-इन आहे. हे अपार्टमेंट अंदाजे 1027 चौरस फुटांचे आहे.


के एल राहुल आणि अथिया शेट्टी यांच्याकडे मोठी संपत्ती


के एल राहुल आणि अथिया शेट्टी यांच्याकडे मोठ्या प्रमाणात संपत्ती आहे. दोघांकडे एकूण 130 कोटी रुपयांची संपत्ती आहे. याशिवाय त्यांच्याकडे बंगळुरुमध्ये कोट्यावधी रुपयांचे अलिशान घर आहे. तसेच या दोघांकडे अनेक अलिशान गाड्या देखील आहेत. 


महत्वाच्या बातम्या:


संजिव गोयंका अन् राहुलमध्ये काय चर्चा झाली, लखनौच्या प्रशिक्षकाचा मोठा खुलासा