Travel : श्रावण आणि शिव, शिवाची पूजा केल्याशिवाय श्रावण महिना अपूर्ण आहे. शिवाची पूजा करूनच श्रावण महिना पवित्र मानला जातो. देशभरात बम भोलेच्या गजरात हा महिना शिवमय होतो. श्रावण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. सोबत पावसाळाही आहे. अशात जर तुम्हाला श्रावणात महाराष्ट्रातील भगवान भोलेनाथाचं दर्शन घ्यायचं असेल, तर जाणून घ्या..


जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर...


जर तुम्हालाही श्रावणमध्ये भगवान शिवाच्या प्राचीन मंदिरांना भेट द्यायची असेल तर तुम्ही देशातील 12 ज्योतिर्लिंगांना भेट देऊ शकता. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही तुमच्या राज्यात असलेल्या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी जाऊ शकता. जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर तुम्ही येथे अनेक ज्योतिर्लिंगांना भेट देऊ शकता. महाराष्ट्रात एकूण पाच ज्योतिर्लिंगे असून त्यात भीमाशंकर ज्योतिर्लिंग, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग, परळी वैजनाथ धाम यांचा समावेश आहे.


महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगे कोठे आहेत?


भीमाशंकर ज्योतिर्लिंग


12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे पुण्यापासून 100 किमी अंतरावर आहे. हे मंदिर सह्याद्रीच्या डोंगरापासून सुमारे 3250 फूट उंचीवर आहे. मंदिर उघडण्याची वेळ सकाळी 4.30 आणि बंद करण्याची वेळ 9.30 आहे.



त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग


या मंदिरात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवांची लिंगांमध्ये पूजा केली जाते. हे मंदिर नाशिकपासून 28 किमी अंतरावर ब्रह्मगिरी पर्वताजवळ आहे. मंदिरात दर्शनाची वेळ पहाटे 5.30 ते रात्री 9 अशी आहे.


 


घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग


घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे आहे. युनेस्कोने याला जागतिक वारसा घोषित केले आहे. या ठिकाणी पुरुष मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करू शकतात. हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे जिथे भक्त हातांनी शिवाच्या लिंगाला स्पर्श करू शकतात. मंदिर सकाळी 5.30 ते रात्री 9.30 पर्यंत खुले असते.


 


औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग


औंढा नागनाथ मंदिर महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात आहे. येथे नागनाथाची पूजा केली जाते. या ज्योतिर्लिंगाची पूजा करणारे भाविक सर्व प्रकारच्या दु:खांपासून मुक्ती मिळते, असा भाविकांचा विश्वास आहे. औंढा नागनाथ मंदिरात पहाटे 4 वाजता दर्शनासाठी जाता येते आणि रात्री 9 वाजता मंदिराचे दरवाजे बंद होतात.


 


परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग


दुसरे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील परळी येथे आहे. या ठिकाणी रावणाने भगवान शंकराची पूजा केली असे मानले जाते. या मंदिराची उघडण्याची वेळ पहाटे 5 वाजता आणि बंद करण्याची वेळ रात्री 9 आहे.


 


महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगाला कसे जायचे?


महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी तुम्ही पुण्यातून प्रवास सुरू करू शकता. पुण्यापासून भीमाशंकर 3-4 तासांच्या अंतरावर आहे. भीमाशंकर ज्योतिर्लिंग ते त्र्यंबकेश्वर मंदिर हा प्रवास 5 ते 6 तासांचा आहे. तर त्र्यंबकेश्वरपासून घृष्णेश्वर 3-5 तासांच्या अंतरावर आहे.


प्रवास करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे टॅक्सी, किंवा स्वत:ची कार, ज्याद्वारे तुम्ही कमी वेळात सर्व ज्योतिर्लिंगांना भेट देऊ शकता. याशिवाय या ठिकाणी बस किंवा रेल्वेची सुविधाही उपलब्ध असेल.


IRCTC वेळोवेळी ज्योतिर्लिंग दर्शनासाठी टूर पॅकेज आणत असते. श्रावणातील शिव मंदिरांच्या टूर पॅकेजसाठी तुम्ही IRCTC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.


 


हेही वाचा>>>


Travel : साईबाबांचे भक्त आहात? तर आज जगातील 'या' मंदिरांबद्दल एकदा जाणून घ्या..! मन:शांती लाभेल, टेन्शन होईल दूर


 


 


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )