Counterfeit Notes : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी देशभरात नोटाबंदीचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि दोन हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. देशभरातील बनावट नोटांचं रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी केंद्र सरकारने हा मोठा निर्णय गेतला होता. पण आरबीआयचा वार्षिक रिपोर्ट पाहिल्यानंतर बनावट नोटांचं प्रमाण वाढलेय. नोटाबंदीच्या सहा वर्षानंतरही बँकिंग सिस्टममध्ये बनावट नोटा आढळत आहेत. त्यामुळे आरबीआयसोबत सरकारचेही टेन्शन वाढलेय. देशात पुन्हा एकदा बनावट नोटांचं संकट वाढलं आहे. सर्वाधिक बनावट नोटा 500 च्या आढळत आहे. गतवर्षी 500 च्या खोट्या नोटा आढळण्याचं प्रमाण तब्बल 100 टक्केंनी वाढलेय. त्यामुळे मार्केटमध्ये असणारी 500 ची नोट खरी आहे का? असा प्रश्न उपस्थित झालाय.
खोट्या नोटांचं वाढतं प्रमाण -
आरसीबीच्या वार्षिक रिपोर्टमध्ये नोटाबंदीनंतर पुन्हा एकदा प्रत्येक वर्षाला खोट्या नोटांचं प्रमाण वाढल्याचं दिसतेय. 2021-22 मध्ये खोट्या नोटांचं प्रमाण 2020-21 च्या तुलनेत 10.7 टक्केंनी वाढलेय. यामध्ये सर्वाधिक 500 च्या खोट्या नोटाचं प्रमाण जास्त आहे. 2020-21 च्या तुलनेत 2021-2022 मध्ये 101.9 टक्केंनी 500 च्या खोट्या नोटा वाढल्या आहेत. तर 2021-2022 मध्ये दोन हजार रुपयांच्या खोट्या नोट्या 2020-21च्या तुलनेत 54.16 टक्केंनी वाढ आहे.
- 42 टक्केंनी खोट्या नोटांचं प्रमाण घटलं -
वर्ष |
किती आढळल्या बनावट नोटा? |
नोटाबंदीच्या पूर्वीचा कालावधी (2011 to 2016) - Total |
27,35,052 |
2016 (नोटाबंदीचं वर्ष) |
7,62,072 |
नोटाबंदीनंतर (2017 to 2022) |
15,76,458 |
नोटाबंदीच्या आधीच्या तुलनेत नोटाबंदीनंतर खोट्या नोटांचं प्रमाण |
42% टक्केंनी खोट्या नोटांचं प्रमाण घटलं |
Source: RBI – Annual Report (2021-22)
नोटाबंदीआधीची खोट्या नोटांची परिस्थिती काय होती?
November 8, 2016 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा केली.
वर्ष |
बँकिंग सिस्टिममध्ये आढळलेल्या बनावट नोटा |
2011-12 |
5,21,155 |
2012-13 |
4,98,252 |
2013-14 |
4,88,273 |
2014-15 |
5,94,446 |
2015-16 |
6,32,926 |
2016-17 |
7,62,072 |
Source: RBI – Annual Report (2021-22)
नोटाबंदीनंतर खोट्या नोटा किती आढळल्या?
- 70 टक्केंनी बनावट नोटा कमी आढळल्या ( 2016-17 to 2021-22)
Year |
बँकिंग सिस्टिममध्ये बनावट नोटांचं प्रमाण |
2017-18 |
5,22,783 |
2018-19 |
3,17,384 |
2019-20 |
2,96,695 |
2020-21 |
2,08,625 |
2021-22 |
2,30,971 |
Source: RBI – Annual Report (2021-22)
गेल्या तीन वर्षांत 500 च्या बनावट नोटा आढळण्याचं प्रमाण कधी कसं होतं.
- गेल्या वर्षी 500 च्या खोट्या नोटा आढळल्याचं प्रमाण तब्बल 102 टक्केंनी वाढलं.
वर्ष |
500 च्या खोट्या नोटा आढळण्याचं प्रमाण |
2019-20 |
30,054 |
2020-21 |
39,453 |
2021-22 |
79,669 |
2021-22 मध्ये 500 च्या खोट्या नोटा वाढल्या |
तब्बल 102 टक्केंनी खोट्या नोटा वाढल्या |
Source: RBI
आरबीआयच्या रिपोर्ट्सनुसार, 10 रुपयांच्या खोट्या नोटांचं प्रमाण 16.4 टक्के आणि 20 रुपयांच्या खोट्या नोटांचं प्रमाणात 16.5 टक्केंनी वाढ झाली आहे. तर 200 रुपयांच्या बनावट नोटांचं प्रमाण 11.7 टक्के आणि 50 रुपयांच्या बनावट नोटांचं प्रमाण 28.7 टक्केंनी वाढलेय. इतकेच नाही तर 100 रुपयांच्या खोट्या नोटाचं प्रमाण 16.7 टक्केंनी वाढलेय. आरबीआयच्या रिपोर्ट्सनुसार, 93.1 टक्के खोट्या नोटा बँकांत मिळाल्या आहेत. तर 6.9 टक्के खोट्या नोटांची ओळख आरबीआयने केली.
खोट्या नोटांचा परिणाम -
खोट्या नोटांमुळे देशाच्य आर्थव्यवस्था कमकुवत होते. खोट्या नोटामुळे बँकिंग व्यवस्थेतील रोखीचा प्रवाह वाढल्याने महागाई देखील वाढते. बनावट नोटांमुळे देशात अवैध व्यवहार वाढतातय कारण अशा व्यवहारांमध्ये कायदेशीर चलन वापरले जात नाही.
खोट्या नोटा आढळल्यास शिक्षा काय?
खोट्या नोटा बाळगणे गुन्हा आहे. तुमच्याकडे खोट्या नोटा आढळल्या तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. आयपीसी कलम 489C नुसार तुम्ही गुन्ह्यास पात्र ठरु शकता..तुम्हाला जन्मठेपीची शिक्षाही होऊ शकते. तसेच आर्थिक भुरदंडही भरवा लागू शकतो.