CNG Price : कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाल्यानंतरही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होत नाहीत. याचा सर्वसामान्य जनतेला मोठा फटका बसत आहे. अशातच आता सीएनजीच्या दरातही (CNG Price) वाढ होत आहे. दिल्ली एनसीआरमध्ये तीन आठवड्यात दुसऱ्यांदा CNG च्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. सीएनजीच्या दरात 1 रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीत सीएनजीची किंमत 76.59 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.


देशाची राजधानी आणि आसपासच्या भागात सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. तीन आठवड्यात दुसऱ्यांदा ही वाढ झाली आहे. यापूर्वी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात  CNG च्या दरात वाढ करण्यात आली होती. सीएनजीच्या किंमती किती वाढल्या आहेत याबाबत सविस्तर माहिती पाहुयात. दिल्लीत सीएनजीची किंमत पेट्रोलच्या तुलनेत 20 रुपयांनी कमी आहे. नवीन किंमती आज म्हणजेच 14 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजल्यापासून लागू झाल्या आहेत. दिल्ली एनसीआरमध्ये सीएनजीच्या किंमतीत वाढ झाली आहे.  


दिल्लीत किती वाढ झाली?


देशाची राजधानी दिल्लीत सीएनजीच्या दरात तीन आठवड्यांत दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. सीएनजीच्या दरात किलोमागे एक रुपयाने वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर देशाची राजधानी दिल्लीत सीएनजीची किंमत 76.59 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. सीएनजीच्या दरात शेवटची घसरण जुलै महिन्यात झाली होती. ऑगस्ट आणि नोव्हेंबर महिन्यात सीएनजीच्या दरात वाढ झाली होती.


NCR मध्ये किती वाढ झाली?


दिल्लीला लागून असलेल्या एनसीआर शहरांमध्ये म्हणजे नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्येही सीएनजीच्या किमतीत वाढ झाली आहे. नोएडा आणि ग्रेटर नोएडामध्येही सीएनजीच्या दरात किलोमागे एक रुपयाची वाढ झाली आहे. नोएडामध्ये सीएनजीची किंमत 82.20 रुपये प्रति किलो झाली आहे. तर ग्रेटर नोएडामध्ये सीएनजीची किंमत 81.20 रुपये प्रति किलो झाली आहे. गाझियाबादमध्ये सीएनजीचा नवा दर 81.20 रुपये प्रति किलो झाला आहे आणि एनसीआरमध्ये समाविष्ट असलेल्या गुरुग्राममध्ये सीएनजी 83.62 रुपये प्रति किलो या दराने विकला जात आहे.


ऑगस्ट आणि नोव्हेंबरमध्ये किती वाढ?


यापूर्वी ऑगस्ट आणि नोव्हेंबर महिन्यात सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली होती. 23 नोव्हेंबर 2023 रोजी दिल्ली आणि एनसीआर भागातही सीएनजीच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या, तर रेवाडीमध्ये किंमती कमी करण्यात आल्या होत्या. त्याआधी ऑगस्ट महिन्यातही सीएनजीच्या दरात वाढ झाली होती. IGL ने ऑगस्टमध्ये वर्षभरात किमतीत दुसरी वाढ केली होती. 23 ऑगस्ट रोजीही दिल्ली-एनसीआरमध्ये सीएनजीच्या किमतीत एक रुपयाने वाढ झाली होती. जुलै महिन्यात महागड्या सीएनजीपासून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने सीएनजीच्या किंमती ठरवण्याच्या मानकांमध्ये बदल केला होता. यानंतर दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये सीएनजीच्या दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली.


महत्त्वाच्या बातम्या:


Best CNG Cars Under 10 Lakh : दहा लाखांपेक्षा कमी किंमतीत येतात 'या' आलिशान CNG कार, पाहा संपूर्ण यादी...