मुंबई: शेअर बाजारासाठी आजचा दिवस नकारात्मक ठरला असून (Closing Bell Share Market Updates) मोठी पडझड झाल्याचं दिसून आलं. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) आज 635 अंकांची घसरण झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये (Nifty) आज 186 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये आज 1.03 टक्क्यांची घसरण होऊन तो 61,067 वर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये आज 1.01 टक्क्यांची घसरण होऊन तो 18,199 वर पोहोचला. निफ्टी बँकमध्येही (Nifty Bank) आज तब्बल 741 अंकांची घसरण होऊन तो 42,617 वर पोहोचला. आजच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे तब्बल4.5 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. 


शेअर बाजारात आज विक्रीचा जोर दिसून आले. ऑईल अॅंड गॅस, पॉवर आणि रियल इस्टेट सेक्टर कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे बाजार बंद होताना मोठी घसरण झाली आणि गुंतवणूकदारांचे 4.5 लाख कोटी रुपये पाण्यात गेले. 


Closing Bell Share Market: मुंबई शेअर बाजाराच्या भांडवलामध्ये मोठी घसरण 


आजच्या झालेल्या या मोठ्या घसरणीनंतर मुंबई शेअर बाजाराच्या एकूण भांडवल मुल्यामध्ये घट झाली आहे. आज मुंबई शेअर बाजाराचे भांडवल 282.87 लाख कोटी रुपये इतकं आहे. मंगळवारी हे भांडवल 287.39 लाख कोटी रुपये इतकं होतं. 


या शेअर्समध्ये वाढ झाली



  • Divis Labs- 4.99 टक्के

  • Apollo Hospital- 3.69 टक्के

  • Cipla- 3.38 टक्के

  • Sun Pharma- 1.75 टक्के

  • HCL Tech- 1.03 टक्के


या शेअर्समध्ये घसरण झाली 



  • Adani Enterpris- 6.32 टक्के

  • Adani Ports- 3.01 टक्के

  • IndusInd Bank- 2.19 टक्के

  • Bajaj Finserv- 2.10 टक्के

  • UltraTechCement- 2.08 टक्के


Stock Markets Updates: शेअर बाजाराची सुरुवात तेजीने 


आज सकाळी बाजारातील व्यवहार सुरू झाले तेव्हा, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (BSE Sensex) 291.42  अंकांच्या तेजीसह 61,993.71  अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (NSE Nifty) 49.85 अंकांच्या तेजीसह 18,435.15 अंकांवर खुला झाला. सेन्सेक्सने 62 हजार अंकांचा टप्पाही ओलांडला होता. मात्र, त्यानंतर विक्रीचा जोर वाढू लागल्याने पुन्हा घसरण दिसू आली. सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 67 अंकांनी वधारत 61,770.06 अंकांवर व्यवहार करत होता. निफ्टी निर्देशांक 23.85 अंकांच्या तेजीसह 18,409.15 अंकांवर व्यवहार करत होता. 


ही बातमी वाचा :