मुंबई: मंगळवारी शेअर बाजारात चांगलीच अस्थिरता दिसून आली. सकाळी वधारलेला बाजार दुपारी बंद होताना मात्र काहीसा घसरलेला दिसून आला. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 435 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही 96 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 0.72 टक्क्यांची घसरण होऊन तो 60,176 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 0.53 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,957 वर पोहोचला आहे. 


आज 2288 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1035 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 97 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. 


आज बाजार बंद होताना ऑटो, FMCG आणि उर्जा या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये 1 ते 3 टक्क्यांची वाढ झाली. तर बँकिंग सेक्टरच्या शेअर्समध्ये 1 टक्क्यांची घसरण झाल्याचं दिसून आलं आहे.  BSE मिडकॅप  आणि स्मॉलकॅपमध्ये - टक्क्यांची 1 टक्क्यांची वाढ झाली आहे. 


मंगळवारी शेअर बाजारात HDFC Bank, HDFC, Bajaj Finserv, Reliance Industries आणि Kotak Mahindra Bank या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली असून  Adani Ports, NTPC, Tata Motors, Power Grid Corporation आणि Tata Consumer Products या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे.


 मंगळवारी शेअर बाजार सुरू झाला तेव्हा 174 अंकांनी वधारला होता, प्री-ओपनिंगमध्ये सकारात्मक संकेत दिसून आले होते. पण शेअर बाजार बंद होताना मात्र त्यामध्ये घसरण झाल्याचं दिसून आलं.


संबंधित बातम्या: 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह -


 


ABP Majha