मुंबई: सलग आठ सत्रामध्ये वाढ झाल्यानंतर आज शेअर बाजारातील तेजीला लगाम लागला आहे. आज शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 651 अंकांची घसरण झाली तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 198 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये 1.08 टक्क्यांची घसरण होऊन तो 59,646 अंकावर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये 1.10 टक्क्यांची घसरण होऊन 17,758 अंकांवर पोहोचला. बँक निफ्टीमध्येही आज 670 अंकांची घसरण झाली आणि तो 38,985 अंकांवर स्थिरावला.
आज शेअर बाजार बंद होताना 1387 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर 1927 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली. आज 122 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. आज IndusInd Bank, Apollo Hospitals, Bajaj Finserv, Tata Motors आणि Hindalco Industries या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली. तर Adani Ports, L&T, Infosys, Eicher Motors आणि Bajaj Auto या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. आयटी, उर्जा आणि कॅपिटल गुड्स क्षेत्र सोडलं तर इतर सर्व क्षेत्रातल्या शेअर्समध्ये आज घसरण झाली आहे. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये 1 टक्क्यांची घसरण झाली
रुपयाची घसरण
शेअर बाजारातील घसरणीचा परिणाम आज रुपयाच्या किमतीवर झाल्याचं दिसून आलं. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या किमतीमध्ये 10 पैशांची घसरण झाली आहे. आज डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत 79.78 इतकी आहे.
शेअर बाजाराची सुरुवात
भारतीय शेअर बाजारात आज काहीशा वाढीसह सरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 53 अंकांनी 60,351 वर तर निफ्टी (Nifty) 10 अंकांनी वाढून 17,955 अंकांवर व्यवहार करत आहे.
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ
- Adani Ports- 4.65 टक्के
- Larsen- 2.19 टक्के
- Infosys- 0.89 टक्के
- Eicher Motors- 0.37 टक्के
- Bajaj Auto- 0.34 टक्के
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण
- IndusInd Bank- 3.78 टक्के
- Bajaj Finserv- 3.08 टक्के
- Apollo Hospital- 3.08 टक्के
- Tata Motors- 2.85 टक्के
- TATA Cons. Prod- 2.59 टक्के
महत्त्वाच्या बातम्या: