मुंबई: भारतीय शेअर बाजारातील घसरण सुरुच असून आजही गुंतवणूकदारांना मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागलं आहे. आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 509 अंकांची घसरण झाली आहे तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 148 अंकांची घसरण झाली आहे. सेन्सेक्समध्ये 0.89 टक्क्यांची घसरण होऊन तो 56,598 अंकांवर स्थिरावला आहे. तर निफ्टीमध्ये 8.87 टक्क्यांची घसरण होऊन तो 16,858 अंकावर पोहोचला. बँक निफ्टीमध्येही आज 599 अंकांची घसरण होऊन तो 37,759 अंकांवर स्थिरावला.  अमेरिकन शेअर बाजार आणि जागतिक शेअर बाजारात झालेल्या घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला. 


Hindalco Industries, JSW Steel, ITC, Axis Bank आणि Reliance Industries या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली. तर Asian Paints, Sun Pharma, Dr Reddy’s Labs, Eicher Motors आणि Power Grid Corp या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. 


आज बँक, ऑईल अॅन्ड गॅस आणि मेटल क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी विक्री झाली आहे तर ऑटो, फार्मा आणि आयटी या क्षेत्रामध्ये खरेदी झाल्याचं दिसून आलं. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये 0.4 टक्क्यांची घसरण झाली. 


शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने 


शेअर बाजारातील व्यवहाराला आज सुरुवात झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 397.39  अंकांनी घसरत  56,710 अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 136.85 अंकांनी घसरत 16,870  अंकांवर खुला झाला. त्यानंतर बाजारात विक्रीचा जोर दिसून आल्याने सेन्सेक्समध्ये 400 हून अधिक अंकांची पडझड दिसून आली. सकाळी 9.45 वाजता सेन्सेक्स 379 अंकांच्या घसरणीसह 56,728.45 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 110 अंकांच्या घसरणीसह 16,896.70 अंकांवर व्यवहार करत होता.


या कंपन्यांचे शेअर्स वधारले



  • Asian Paints- 2.88

  • Sun Pharma- 2.31

  • Dr Reddys Labs- 2.11

  • Eicher Motors- 1.62

  • Power Grid Corp- 1.39


या कंपन्यांचे शेअर्स घसरले 



  • Hindalco- 3.44

  • JSW Steel- 3.22

  • ITC- 2.96

  • Axis Bank- 2.85

  • Reliance- 2.66


महत्त्वाच्या बातम्या :