Debit card News : बदलत्या काळानुसार बँकिंग (Banking) सेवा सहज सोप्या झाल्या आहेत. याआधी ग्राहकांना तासनतास ताटकळत उभं राहावं लागत होतं. पण एटीएम आणि डेबिट कार्ड (Debit card News) आल्यानंतर रांगेत उभं राहण्याची झंझट संपली आहे. आता जवळच्या एटीएम मशीनमधून पैसे काढले जात आहे. सध्या सोबत रोख रक्कम ठेवण्याचीही गरज नाही. अनेक दुकानात स्वाइप मशीन असते. पण महत्वाचा प्रश्न असाय की, इतक्या छोट्या कार्ड्समार्फत इतकी मोठी कामं कशी होतात... याचा तुम्ही कधी विचार केलाय  का? कार्डवर (Debit card News) असणाऱ्या 16 अंकाचा अर्थ काय? याबाबत तुम्हाला माहितेय का? तर चला मग याबाबत जाणून घेऊयात.. (Utility News In Marathi)


 कार्डवरील 16 अंकामध्ये मोठी माहिती-
डेबिट कार्ड अथवा एटीएम पाहिल्यानंतर त्यावर तुम्हाला 16 अंकाचा एक विशिष्ट नंबर दिसेल... या 16 अंकामध्ये महत्वाची आणि मोठी माहिती असते. हा 16 अंकाचा क्रमांक व्हेरिफिकेशन, सिक्योरिटी आणि तुमच्या ओळखीसाठी महत्वाचा आहे. जेव्हा तुम्ही पेमेंट करता तेव्हा या 16 क्रमांकामुळे तुमच्या बँक खात्याचा नंबर, कार्ड कोणत्या कंपनीचं आहे... याबाबतची सर्व माहिती मिळते. 


16 क्रमांकामधील पहिले 6 क्रमांक बँक आयडेंटिफिकेशन नंबर (Bank Identification Number) असतो. त्यानंतरचे 10 अंकाला कार्ड होल्डरचा युनिक नंबर (card holder unique number) म्हटले जाते. त्यामुळेच कार्ड हरवल्यास तात्काळ ब्लॉक (block debit card) करण्याची सूचना दिली जाते. पाहूयात 16 क्रमांकाचा अर्थ काय? (Utility News In Marathi)




पहिला क्रमांक - 
कार्ड कोणत्या इंडस्ट्रीने जारी केले, हे कार्डवर असणारा पहिल्या क्रमांक सांगतो. या कार्डला मेजर इंडस्ट्री आयडेंटिफाय (Major Industries Identification) म्हटले जाते.  


अंकाचा अर्थ काय?
कार्डचे पहिले सहा क्रमांक कोणत्या कंपनीनं कार्ड इश्यू केलेय, याची माहिती देतात. याला  इश्यूर आयडेंटिफिकेशन नंबर (issuer Identification number) म्हटले जाते. सातव्या क्रमांकापासून 15 व्या क्रमांकापर्यंतच्या नंबरचा संबंध बँक खात्याशी आहे. अखेरच्या 16 क्रमांकाचा अर्थ तुमचं कार्ड कधीपर्यंत व्हॅलिड असल्याचं सांगतो. अखेरच्या शब्दाला चेकसम डिजिट म्हटले जाते. (Utility News In Marathi)


आणखी वाचा :
Utility News : एकापेक्षा जास्त Saving Account असणं फायद्याचं, कसं ते जाणून घ्या?
PPF खात्यामुळे व्हाल कोट्यधीश, निवृत्तीनंतर 2.26 कोटी मिळवण्यासाठी सरकारी योजनेत करा गुंतवणूक