Stock Market Updates: गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात सुरु असलेल्या अस्थिरतेला (Share Market Updates Closing Bell) आज लगाम लागल्याचं दिसून आलं. शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांमध्ये आज वाढ झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये आज 562 अंकांची वाढ झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये आज 158 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये आज 0.94 टक्क्यांची वाढ होऊन तो 60,655 वर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये 0.89 टक्क्यांची वाढ होऊन तो 18,053 वर स्थिरावला. 


आज बाजार बंद होताना 1641 शेअर्समध्ये वाढ झाली, तर 1764 शेअर्समध्ये घसरण झाली. आज एकूण 133 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. शेअर बाजार बंद होताना L&T, HUL, HDFC, HCL Technologies आणि HDFC Bank या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. तर  SBI, IndusInd Bank, Bajaj Finserv, Wipro आणि Tata Steel कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली. 


दुसरीकडे, रिअॅलिटी, एनर्जी, इन्फ्रा, पॉवर, कॅपिटल गुड्स आणि एफएमसीजी या क्षेत्रातील शेअर्समध्ये प्रत्येकी एका टक्क्याची वाढ झाली. तर सार्वजनिक बँकांच्या इंडेक्समध्ये दोन टक्क्याची घट झाली. बीएसई स्मॉलकॅप आणि मिडकॅप इंडेक्समध्येही काहीशी घसरण झाली. 


Rupee Close: रुपयाच्या किमतीत 16 पैशांची घट 


डॉलरच्या तुलनेत आज रुपयाच्या किमतीत 16 पैशांची घट झाली. डॉलरच्या तुलनेत आज रुपयाची किंमत 81.61 इतकी आहे. 


Stock Market Updates: शेअर बाजाराची सुरुवात तेजीने  


आज शेअर बाजाराची सुरुवात किंचित वाढीने झाली. BSE चा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 49.11 अंकांच्या म्हणजेच 0.082 टक्क्यांच्या किंचित वाढीसह 60,142 वर उघडला. तसेच NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी आज 27.95 अंकांच्या म्हणजेच 0.16 टक्क्यांच्या वाढीसह 17,922.80 वर उघडला.


या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली 



  • Larsen- 3.55 टक्के

  • HUL- 2.71 टक्के

  • HDFC- 1.77 टक्के

  • HCL Tech- 1.59 टक्के

  • HDFC Bank- 1.49 टक्के


या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली 



  • SBI- 1.67 टक्के

  • Bajaj Finserv- 0.79 टक्के

  • IndusInd Bank- 0.72 टक्के

  • Wipro- 0.56 टक्के

  • Tata Steel- 0.50 टक्के


ही बातमी वाचा: