मुंबई: सलग पाच सत्रांच्या घसरणीनंतर आज शेअर बाजार काहीसा वधारला आहे. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 581.34 अंकांनी वाढला तर निफ्टीही 150.30 अंकानी वाढला आहे. सेन्सेक्समध्ये 1.10 टक्क्यांची वाढ होऊन तो 53,424.09 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 0.95 टक्क्यांची वाढ होऊन तो 16,013.50 वर पोहोचला आहे.
आज 2193 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1069 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 84 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.
आज बाजार बंद होताना मेटल क्षेत्र सोडलं तर इतर सर्व क्षेत्रांच्या शेअर्समध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही 1 टक्क्यांची वाढ झाली आहे.
मंगळवारी शेअर बाजारात IOC, Sun Pharma, Tata Consumer Products, Cipla आणि TCS या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी वाढ झाली असून Hindalco Industries, ONGC, Tata Steel, JSW Steel आणि Britannia Industries या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली आहे.
या कंपन्यांचे शेअर्स वधारले
- IOC- 4.28 टक्के
- Sun Pharma- 3.93 टक्के
- TATA Cons. Prod- 3.61 टक्के
- TCS- 3.30 टक्के
- Cipla- 3.02 टक्के
या कंपन्यांचे शेअर्स घसरले
- Hindalco- 4.81 टक्के
- ONGC- 4.20 टक्के
- Tata Steel- 1.73 टक्के
- Britannia- 1.26 टक्के
- JSW Steel- 1.15 टक्के
गुंतवणूकदारांचे सोमवारी 6.32 लाख कोटींचे नुकसान
सोमवारी भारतीय शेअर बाजारातही मोठी घसरण झाली होती. युद्धामुळे लागलेल्या आगीत शेअर बाजारातील गुंतवणूकदार होरपळले आहेत. सोमवारी दुपारपर्यंत गुंतवणूकदारांचे जवळपास 6.32 लाख कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. जागतिक पातळीवर झालेल्या पडझडीचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारावर झाला. सोमवारी गुंतवणूकदारांना 6,32, 530 लाख कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बीएसईमध्ये सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल (Market Capitalization) सोमवारी 2,46,79,421.28 कोटी रुपये होते. बाजारातीस घसरणीमुळे बाजार भांडवल 2,40,46,891 लाख कोटी रुपये इतके झाले आहे. परदेशी गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू आहे. परदेशी गुंतवणूकदारांना 4 मार्च 2022 पर्यंत 7,631 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha