मुंबई: शेअर बाजारात गेल्या आठवड्यातील घसरणीला आज लगाम लागला असून बाजारात काहीसे सकारात्मक संकेत दिसून आले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या सेन्सेक्समध्ये आज 237 अंकांची वाढ झाली तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या निफ्टीमध्ये 56 अंकांची वाढ झाल्याचं दिसून आलं. सेन्सेक्समध्ये आज 0.46 टक्क्यांची वाढ होऊन तो 15,350 अंकावर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये 0.37 टक्क्यांची वाढ होऊन तो 15,350 वर पोहोचला. 


गेल्या आठवड्यात शेअर बाजारामध्ये सातत्याने घसरण सुरू होती. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आज सकारात्मक संकेत मिळाले. आज बाजार बंद होताना 673 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 2663 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 156 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.


आज बाजार बंद होताना एफएमसीजी क्षेत्रामध्ये एक टक्क्यांची वाढ झाली आहे तर आयटी क्षेत्रातील शेअर्स 0.5 टक्क्यांनी वधारले. ऑईल अॅन्ड गॅस, मेटल आणि कॅपिटल गुड्सच्या शेअर्समध्ये 1 ते 4 टक्क्क्यांची घसरण झाली आहे. बीएसई मिडकॅप इंडेक्समध्ये 1.4 टक्के तर स्मॉलकॅप इंडेक्समध्ये तीन टक्क्यांची घसरण झाली आहे.


HUL, HDFC, Apollo Hospitals, Asian Paints आणि UltraTech Cement या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे. तर  ONGC, Tata Steel, UPL, Hindalco Industries आणि Coal India च्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 


रुपया काहीसा वधारला
गेल्या काही दिवसांपासून डॉलरच्या तुलनेत रुपयाची सातत्याने घसरण सुरू आहे. पण आज रुपयाच्या किमतीत किंचित वाढ झाली आहे. आज डॉलरच्या तुलनेत रुपयांची किंमत 77.98 वर पोहोचली आहे. 


या कंपन्यांचे शेअर्स वाढले



  • HUL- 4.05 टक्के

  • HDFC- 4.02 टक्के

  • Asian Paints- 3.12 टक्के

  • UltraTechCement- 3.01 टक्के

  • Apollo Hospital- 2.98 टक्के


या कंपन्यांचे शेअर्स घसरले



  • Tata Steel- 5.00 टक्के

  • ONGC- 4.98 टक्के

  • UPL- 3.71 टक्के

  • Hindalco- 3.66 टक्के

  • Coal India- 3.18 टक्के