Dalip Tahil : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खान (Aamir Khan) आणि अभिनेत्री जूही चावलाचा ‘कयामत से कयामत तक’ (Qayamat Se Qayamat Tak ) हा चित्रपट प्रेक्षक आजही आवडीनं बघतात. या चित्रपटामधील गाण्यांना, कलाकारांच्या अभिनयाला आणि चित्रपटाच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटाचे दिग्दर्शन मंसूर खान यांनी केलं होतं. चित्रपटामध्ये अभिनेते दलीप ताहिल यांनी (Dalip Tahil) आमिरच्या वडिलांची भूमिका साकारली होती. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये दलीप यांनी ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटाबद्दल सांगितलं. 


मुलाखतीमध्ये दलीप यांनी सांगितलं की, 'नासिर हुसैन यांनी मला आमिरच्या वडिलांची भूमिका साकारायला सांगितली होती. बुनियाद मालिकेनंतर मला कयामत से कयामत तक चित्रपटाची ऑफर मिळाली.   मी जेव्हा या चित्रपटामध्ये आमिरच्या वडिलांची भूमिका साकारली तेव्हा माझं वय हे 31 होतं. पण चित्रपटामध्ये जास्त वय असणारी भूमिका साकारण्याचा निर्णय घेताना विचार केला नाही. तेव्हा माझं लग्न देखील झालं नव्हतं.'



पुढे दलीप म्हणाले, 'या चित्रपटामध्ये संजीव कुमार आणि शम्मी कपूर काम करणार होते.  नासिर हुसैन हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार होते. पण त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानं मंसूर खान यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन करण्याचा निर्णय घेतला. नासिर हुसैन यांनी या चित्रपटामध्ये संजीव कुमार आणि शम्मी कपूर यांना कास्ट करायचे होते. पण मंसूर खान त्या दोघांसोबत काम करण्यास नकार दिला.'


आमिर खान, जुही चावला, गोगा कपूर, रवींद्र कपूर, आलोक नाथ, रीमा लागू आणि अजित वाचानी या कलाकारांनी ‘कयामत से कयामत तक’ चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.





दलीप यांचा Toolsidas Junior हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. मृदुल महेंद्र या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं.  या चित्रपटात संजय दत्त, राजीव कपूर आणि वरुण बुद्धदेव यांनी देखील काम केले आहे. 


हेही वाचा: